Ajit Pawar Death : दादांची शेवटची सही सुद्धा स्मशानभूमीच्या कामासाठी, दुर्दैवी योगायोग सांगताना सरोज अहिरेंना अश्रू आवरेना

MLA Saroj Ahire Emotional at Ajit Pawar Condolence Meeting : दादांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर तेव्हाही आमदार सरोज अहिरे यांनी हंबरडा फोडला होता. त्यानंतर आता शोकसभेतही त्यांना अश्रू आवरले नाहीत.
MLA Saroj Ahire Emotional at Ajit Pawar Condolence Meeting
Ajit Pawar, MLA Saroj AhireSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar death : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28 जानेवारी) बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून ठिकाठिकाणी शोकसभा होत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने देवळाली विधानसभा मतदारसंघात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दादांची शेवटची सही सुद्धा माझ्या मतदारसंघातील स्मशानभूमीच्या कामासाठी होती, हा दुर्देवी योगायोग सरोज अहिरे यांनी यावेळी सांगितला.

शोकसभेत भाषणा दरम्यान सरोज अहिरे यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्या म्हणाल्या, दादा गेले हे मन आजूनही मानायला तयार नाही. ते आवाज देतील असे वाटते. आपल्याला मुंबईत बोलावतील, असे वाटते. एका फाईलमुळे अजितदादांची वेळ चुकली. मुंबईहुन मंगळवारीच संध्याकाळीच कारने अजित पवार निघणार होते. परंतु विदर्भातील धान खरेदीच्या एका फाईलवर अजित पवार यांची सही हवी होती. त्यासाठी दादा मुंबईला थांबले नाहीतर गाडीने निघून जाणार होते. ते गाडीने निघून गेले असते तर ते आज आपल्यात असते अशी खंत सरोज अहिरे यांनी व्यक्त केली.

MLA Saroj Ahire Emotional at Ajit Pawar Condolence Meeting
Girish Mahajan : त्यांची काही तरी अडचण असेल.. सूनेत्रा पवारांच्या शपथविधीवर भाजपच्या संकटमोचकांचे मोठे विधान

अजितदादांनी माझ्यासारख्या सामान्य मुलीला आमदार केलं. माझ्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी मी लहान होते. बाप वारला हेही कळत नव्हते. पण आता माझा दादाही गेला. माझे आयुष्य घेतले असते तरीही चालले असते. पण, माझा दादा, शेतकऱ्यांचा नेता पाहिजे होता. दादांनी घाणेरडे राजकारण कधीही केले नाही, अशा भावना सरोज अहिरे यांनी व्यक्त केल्या.

अजित दादांनी शेवटची सही माझ्या मतदारसंघातील सय्यद पिंपरी गावाच्या स्मशानभूमीसाठी केली. स्मशानभूमीच्या कामासाठी 1 कोटी रुपये मंजूर करत त्या फाईलवर शेवटची सही दादांनी केली. शेवटचं काम दादांनी माझ्यासाठी केलं. मला आणि माझ्या मुलाला त्यांनी आशीर्वाद दिला होता. कसे विसरणार मी त्यांना आणि कसे अश्रु थांबणार असं सरोज अहिरे म्हणाल्या.

MLA Saroj Ahire Emotional at Ajit Pawar Condolence Meeting
Nashik BJP Politics : मुंबईसाठी भाजपकडून नाशिकमध्ये तडजोड? शिवसेना व राष्ट्रवादीला सत्तेत घेण्याच्या हालचाली..

आम्ही सर्व आमदार पवार कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहू. पक्षाचा आदेश आला आहे, त्यामुळे मला मुंबईला जावे लागत आहे. काय घडतंय काय नाही माहित नाही पण पक्षाचा आदेश आहे जावे लागेल. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची रजा घेऊन मुंबईला निघत असल्याची माहिती त्यांनी शोकसभेत दिली.

दादा गेले, आज माझा खूप मोठा आधार हरपला आहे. काम करत आलोय, काम करत राहू, ही दादांची शिकवण होती. त्यानुसार आम्ही काम करतच राहणार आहोत. दादा पुन्हा येतील, आमचे वाईट स्वप्न निघून जाईल असे वाटते. देवा जिथे कुठे असशील तर आमच्या दादाला पुन्हा आण अशी आर्त साद त्यांनी घातली. दादाचे आणि माझे रक्ताचे नाते नव्हते. पण, त्यांनी मला खूप प्रेम दिले. शेवटची सही माझ्या मतदारसंघाच्या कामासाठी केली. मी आयुष्यभर कधीही राष्ट्रवादी सोडणार नाही, असं सरोज अहिरे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com