Thane Heavy Rain; DCM Eknath Shinde sarkarnama
कोकण

Eknath Shinde : शिंदेंचा आपत्ती व्यवस्थापन प्रमुखाला दणका! सहाय्यक आयुक्ताला केलं तडकाफडकी सस्पेंड; महापालिका प्रशासनात खळबळ

Eknath Shinde Suspends Thane Disaster Management Chief : ठाण्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त यासीन तडवी यांना कथित हलगर्जीपणाबद्दल ८ दिवसांसाठी निलंबित केले.

Aslam Shanedivan

Thane News : काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरांसह उपनगरातील सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर पावसामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक भूमिका घेत थेट ठाणे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा सहाय्यक आयुक्तांनाच दणका दिला आहे. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत शिंदेंनी सहाय्यक आयुक्तांना ८ दिवसांसाठी निलंबित केले आहे. या कारवाईनंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही, असा स्पष्ट इशारा शिंदेंनी दिला आहे.

ठाण्यात मागील पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून शहरांसह उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. यावरून शिंदे यांनी कठोर भूमिका घेत ठाणे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यासीन तडवी यांना निलंबित केले आहे. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत तडवी यांना ८ दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश शिंदेंनी दिले आहेत.

कारवाई का केली?

ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांनी स्वतः उपस्थित राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मात्र, विविध ठिकाणी दुर्घटना घडल्यानंतरही आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त तिकडे फिरकलेच नाहीत.

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयाला स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक भेट दिली. यावेळीही सहाय्यक आयुक्त कार्यालयात उपस्थित नव्हते. या निमित्ताने त्यांच्या कामातील हलगर्जीपणा उघडकीस आला. यावरून शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त करत तडवी यांच्या थेट निलंबनाचे आदेश दिले.

तसेच, शिंदे यांनी यावेळी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही, असा इशाराही दिला. यावेळी ते म्हणाले की, आपत्तीच्या काळात जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना हा इशारा असून, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. याच कारणामुळे आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांना ८ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच, लवकरच महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागासाठी अधिक सक्षम आणि कार्यक्षम अधिकारी नियुक्त केले जातील. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून तातडीने मनुष्यबळही वाढवले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT