Heavy Rain: मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलेली ढगफुटी टळली; मात्र, दुसऱ्याच दिवशी मुसळधार पावसाचा दणका, त्र्यंबकेश्वर -नाशिकचा संपर्क तुटला!

Chief Minister's cloudburst fears averted, but heavy rains lashed Nashik city-ज्याची भीती तेच घडले; मुसळधार पावसाने कुंभमेळ्याच्या कामांची दैना, दोन पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला
Nashik_Rain
Nashik_RainSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नाशिकला ढगफुटीची भीती व्यक्त केली होती. ढगफुटी टळली मात्र मुसळधार पावसाने नाशिकला झोडपले. काल रात्रभर पावसाने नाशिक शहरात हाहाकार उडाला. 

मुसळधार पावसाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहर आज पुन्हा पाण्याखाली गेले. सबंध शहरात गोदावरी, नंदीनी नदीचा पूर आणि पावसाचे पाणी वाहत होते. त्र्यंबकेश्वर परिसरात पुराच्या पाण्याने दुरावस्था झाली. शहरातील शाळांना सुटी जाहीर करावी लागली.

नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि घोटी शहराला जोडणारा नवा पूल बांधण्यात आले होते. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा पूल वाहून गेला. त्यामुळे त्र्यंबकेश्वर चा संपर्क तुटला. या परिसरात अनेक ठिकाणी गावे आणि शेती पाण्याखाली गेली. 

Nashik_Rain
Nashik Rain: नाशिकवरील ढगफूटीबाबत मोठी अपडेट! ढग सुरत-अकोलेकडे सरकले; संकट टळले, सतर्कतेचे आवाहन

मुसळधार पावसाने नाशिक शहरातील जनजीवन ठप्प झाले. पाण्याचे संकट असलेल्या शहराला पुरवठा करणारा गंगापूर धरण दोन दिवसाच्या पावसाने ५४ टक्के भरले. गोदावरी नदीला पूर आला. दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचले होते. पाण्याचे संकट टळले, मात्र पावसाने संकट निर्माण केले.

Nashik_Rain
Nashik Rain update : नाशिकला ढगफुटीच्या इशाऱ्याने यंत्रणा अलर्ट; त्र्यंबकला रात्रभरात १२५ मीमी पाऊस : गिरीश महाजनांची झोप उडाली, सकाळी मात्र दिलासा

नाशिक त्रंबकेश्वर रस्त्यावर पिंपळगाव बहुला येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे पुलाचे काम सुरू होते. नंदिनी नदीला पूर आल्याने हा पूल वाहून गेला. त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर चा संपर्क तुटला. या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

नाशिक शहरात सिडको, सातपूर, पाथर्डी गाव, दाढेगाव या ठिकाणी पुराच्या पाण्याने दुरावस्था झाली. दिढेगाव आणि नाशिक शहराचाही संपर्क तुटला. अंबड लिंक रोड, गंगापूर रोड तसेच अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या रस्त्यांची पावसाच्या पाण्याने दुरावस्था झाली. 

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी शहरात पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पाहणी केली. महापौर हिमगौरी अडके तसेच उपमहापौर विलास शिंदे आणि स्थानिक नगरसेवकांनी ठिकठिकाणी पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आपत्कालीन व्यवस्था सक्रिय करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना व विशेषता गोदावरी नदी पात्र लगत राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

नाशिक शहरात जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. विशेषता शहरात ठिकठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सुरू आहेत. या कामांना  व त्याच्या गुणवत्तेला पावसाने आव्हान दिले. त्यामुळे अनेक ठिकाणी असलेले काँक्रीट वाहून गेल्याचे विदारक चित्र दिसले. 

शहरातील प्रतिष्ठित मानलेल्या गंगापूर रोडवर अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. गंगापूर गाव येथे वसंतराव कानिटकर उद्यानासमोरचा रस्ता वाहून गेला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या. महापालिका अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी भेट दिली. अग्निशमन विभागाने परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. 

सिडकोत नंदिनी नदीला ठिकठिकाणी बंदिस्त केल्याने त्याचे दुष्परिणाम दिसून आले. नदीला मोठा पूर आला. पत्रात फसविलेली घरे पाण्याखाली गेली. सेंटर मॉल येथील पुलाला पाण्याने स्पर्श केला. सिडको आणि सातपूर भागात अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले होते. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com