Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
कोकण

Eknath Shinde Politics : शिंदेंनी एकाच दगडात 2 पक्षी मारले, कोकणात लावलेली फिल्डिंग ठाकरेंपेक्षा भाजपचं टेन्शन वाढवणारी

Shiv Sena political strategy : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालेल्या शिंदेंच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स दुणावला आहे. विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आतापासूनच कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे.

Jagdish Patil

Kokan politics Maharashtra : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालेल्या शिंदेंच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स दुणावला आहे. विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने (Shivsena) आतापासूनच कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठीच शिंदेसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

या ऑपरेशन अंतर्गत अनेक नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन माजी आमदार येत्या काही दिवसांत शिंदेंच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे या आमदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास तो उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) मोठा धक्का मानला जात आहे.

तर ठाकरेंची साथ सोडणाऱ्या नेत्यांमध्ये राजन साळवी, सुभाष बने आणि गणपत कदम यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. माजी आमदार सुभाष बनेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला असून 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या रत्नागिरी दौऱ्यात ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सुभाष बनेंसह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने हे देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान,राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गणपत कदमही शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र, शिंदेच्या शिवसेनेत सुरू असलेलं हे इन्कमिंग ठाकरे गटासह भाजपचं टेन्शन वाढवणारं आहे.

कारण मागील अनेक वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्यासाठी भाजपचे अनेक नेते प्रयत्न करत आहेत. यासाठी भाजपने कोकणातील काही माजी आमदारांशी संपर्क केला होता. यामध्ये राजन साळवींचा देखील समावेश असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या आमदारांनी भाजपमध्ये न जाता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जात आहे.

एकीकडे राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी राजन साळवींना एकनाथ शिंदे प्रवेश देतील असं वाटत नसल्याचं वक्तव्य केलं आहे. शिवाय शिंदे जो काही निर्णय घेतील तो मला आणि उदय सामंतांना विश्वासात घेऊनच घेतील असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे साळवींच्या प्रवेशाला सामंत बंधूंचा विरोध असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेत साळवींचा प्रवेश होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT