
Jalna News, 09 Feb : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मेहुणा विलास हरिभाऊ खेडकर याच्यावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मागील अनेक दिवसांपासून मराठवाड्यातील वाळू माफीयांची चर्चा राज्यभरात चालू आहे.
अशातच आता जालन्यात वाळू माफियांसह अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशासनाने जवळपास 9 आरोपींना जालना, बीड (Beed), परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार केलं आहे.
तडीपार केलेल्यांमध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मेहुण्याचा देखील समावेश आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. या सर्व आरोपींविरोधात जालन्यातील (Jalna) विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
तर कारवाई केलेल्यांपैकी आरोपी मनोज जरांगेंच्या आंदोलनात सक्रीय होते. त्यांना देखील परभणी, जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. या आरोपींवर वाळू तस्करी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवालीतील आंदोलना दरम्यान केलेली जाळपोळीसह सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत.
तडीपारीची कारवाई झालेल्यांमध्ये, विलास हरिभाऊ खेडकर (जरांगेंचा मेहुणा), अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.