Anant Geete Sarkarnama
कोकण

Raigad Lok Sabha News: लोकसभेच्या निकालापूर्वीच रायगडमध्ये झळकले गीतेंच्या विजयाचे बॅनर

Jagdish Patil

Anant Geete News : रायगड लोकसभा निवडणुकीसाठी अतिशय चुरशीची लढत झाली. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) विरुद्ध महाविकास आघाडीचे अनंत गीते (Anant Geete) यांच्यात काट्याची टक्कर झाली. मतदानानंतर रायगड लोकसभेचं मैदान कोण जिंकणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

लोकसभेचा निकाल चार जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र, निकालापूर्वीच रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, या बॅनरवर अनंत गीते (Anant Geete) यांचा भावी केंद्रीय मंत्री म्हणून उल्लेख देखील करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बॅनरवर लिहिलं आहे, 'अनंत गीते साहेब बहुमताने विजयी झाल्याबद्दल अभिनंदन!' तसेच या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंचा फोटो लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. तर लोकसभेचा निकाल लागायला अजून आठवडा बाकी आहे. अशातच ठाकरे गटाकडून रायगडमध्ये (Raigad) बॅनरबाजी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही शिवसैनिकांनी माणगाव तालुक्यात गोरेगाव बस स्थानक परिसरात गीते यांचे बॅनर लावले आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha Constituency) महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) अनंत गीतें यांना उमेदवारी देण्यात आली होती. दोन्ही उमेदवारांमध्ये मुख्य लढत होती शिवाय ही निवडणूक खूप चुरशीची झाली आहे.

तर दोन्ही उमेदवारांकडून आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला जात असतानाच गीते यांच्या बॅनरमुळे नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. बॅनर लागले तर रायगड मतदारसंघातील कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार हे 4 जूनलाच कळेल. त्यामुळे सर्वांना आता लोकसभेच्या निकालाची प्रतिक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT