MNS News : "हिंदुत्वाच्या विचारानं पदवीधर, विधानसभा आणि महापालिका निवडणूक लढणं सोडायचे का?" मनसे नेत्याचा सवाल

Abhijit Panse Vs Niranjan Davkhare : कोकण पदवीधर निवडणुकीच्या मैदानात मित्र पक्ष भाजप आणि मनसेत सामना होण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Konkan Graduate Election News, 28 May : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत महायुतीच्या सभांमध्ये सहभागी झालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघात दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे.

कोकण पदवीधर मतदाससंघातून भाजपचे निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) हे आमदार आहेत. सलग तिसऱ्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारी आहेत. असं असताना मनसेकडून पानसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या शिवसेनेतही खळबळ उडाली आहे. मनसेनं या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण, मनसे हिंदुत्वाच्या विचारांची आहे. भाजपही त्याच विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचं मतदान विभागल्यामुळे तिसऱ्याचा फायदा होऊ शकत नाही का? असा प्रश्न मनसे नेते अविनाश जाधव यांना विचारण्यात आला. त्यावर हिंदुत्वाच्या विचारानं पदवीधर, विधानसभा, महापालिका निवडणूक लढायची नाही का? असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

अविनाश जाधव म्हणाले, "हिंदुत्वाच्या विचारानं पदवीधर, विधानसभा आणि महापालिका निवडणूक लढणं सोडायचे का? असा आमचा पक्ष चालणार आहे का? आमचेही कार्यकर्ते मेहनत करत आहेत.

लोकसभा निवडणुकीत देशाचा विषय असल्यानं तिथे राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय योग्य होता. आता विधानपरिषद निवडणुकीत देशाचा विषय नाही. येथे कोकणात युद्ध होणार आहे का? या निवडणुकीत रोजगाराचा विषय महत्वाचा आहे. रोजगाराच्याच विषयावर निवडणूक होणार आहे."

"कोकणात कुठेही सर्जिकल स्ट्राइक किंवा 370 कलम नाही. आमची मैत्रीपूर्ण लढत होईल. कोकणात जी गोष्टी झाली नाही, ती ठासून बोलणार.. त्या प्रश्नांवरून मतदारांकडे जात मते मागणार," असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.

Raj Thackeray
Narendra Modi & Raj Thackeray Sabha : राज ठाकरेंच्या मागण्यांवर मोदींनी अवाक्षरही काढले नाही, नेमकं सभेत घडलं काय?

12 वर्षांत पदवीधरांसाठी एकही काम नाही

उमेदवार अभिजीत पानसे यांनी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही निवडणूक लढत आहे. आम्ही ही निवडणूक स्वतंत्र लढत आहे. कोकण पदवीधर मतदासंघात मागील 12 वर्षांत पदवीधरांसाठी एकही काम झाले नाही," असा आरोप अभिजीत पानसे यांनी निरंजन डावखरे यांच्यावर केला आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray News : राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींसमोरच तडाखेबंद भाषण; ठणकावून सांगितल्या '7' डिमांड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com