Fadnavis Government wine subsidy policy  sarkarnama
कोकण

Fadnavis Government : सरकारचा ‘फ्रूट वाईन’ फॉर्म्युला! आता द्राक्ष-आंबा-काजू-चिक्कूसह सर्व फळांच्या वाईनला अनुदान; कोकणात नवी संधी

Maharashtra Mahayuti Government wine subsidy policy : कोकणासह विदर्भातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या एका निर्णयाचा मोठा फायदा होणार असून आता राज्यातील उत्पादित, फळे, फुले व मध यापासून बनलेल्या वाईनला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झााल आहे.

Aslam Shanedivan

  1. अतुल भातखळकर यांनी विधानसभेत फळे, फुले व मधापासून तयार होणाऱ्या वाईन उद्योगासाठी प्रोत्साहन अनुदानाबाबत प्रश्न उपस्थित केला.

  2. त्यावर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एकात्मिक धोरण तयार केले जात असून अनुदानाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे सांगितले.

  3. पालघर, नाशिक, सातारा, रायगड आणि पुणे जिल्ह्यांतील वाईन उद्योग आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे.

Mumbai News : प्रचलित द्राक्ष वाईन उद्योग प्रोत्साहन योजनेत आता नव्या फळांसह फुलांच्या वाईन उत्पादनाचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यातील महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील पालघर, नाशिक, सातारा, रायगड आणि पुणे जिल्ह्यात वाईन बनवणाऱ्या उद्योगांना चालना मिळणार असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यासदंर्भात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न मांडला होता. ज्याला उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.

भातखळकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न मांडत प्रचलित वाईन उद्योग प्रोत्साहन योजनेत द्राक्षांप्रमाणेच फळे, फुले व मध यापासून उत्पादित होणाऱ्या वाईनला प्रोत्साहन अनुदान दिले जाणार का असा सवाल उपस्थित केला होता. ज्यावर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी, प्रचलित वाईन उद्योग प्रोत्साहन योजनेत द्राक्षांपासून वाईन उत्पादित करणाऱ्या घटकांसोबत राज्यात उत्पादित फळे, फुले व मध यापासून वाईन उत्पादन करणाऱ्या घटकांचा समावेश करुन एकात्मिक धोरण बनवले जात आहे. या सर्व घटकांना प्रोत्सहन अनुदान देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचे सांगितले.

यामुळे आता द्राक्षांपासून वाईन उत्पादित करणाऱ्या घटकांसोबत राज्यात उत्पादित फळे, फुले व मध यापासून वाईन उत्पादन करणाऱ्या सर्व घटकांना प्रोत्सहन अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द्राक्ष वायनरीजने केंद्र सरकारकडे भरलेल्या मूल्यवर्धित करातील (२० टक्के व्हॅट) ८० टक्के परतावा राज्य शासन वाईन उद्योजकांना प्रोत्साहन अनुदान देते. याच धर्तीवर राज्य शासन लवकरच एकात्मिक धोरण आणणार असून त्याअंतर्गत प्रोत्साहन अनुदान देणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारने हा निर्णय घेत्यास पालघर जिल्ह्यातील चिकू, नाशिक जिल्ह्यातील जांभुळ, साताऱ्यातील स्ट्रॉबेरी, रायगडमधील आंबा आणि पुणे जिल्ह्यातील मधापासून वाईन बनवणाऱ्या उद्योगांना बुस्टर मिळणार आहे. मिळणाऱ्या प्रोत्साहन अनुदानामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे.

दरम्यान राज्यातील वाईन उद्योगांना प्रोत्साहन म्हणून २००९ पासून व्हॅटचा परतावा अनुदान म्हणून दिला जातो. हा परतावा ३५ द्राक्ष वायनरीजना मिळत असून तो वार्षिक १ ते २० कोटी रुपयांपर्यंत आहे. पालघर जिल्ह्यात चिकू, नाशिक जिल्ह्यात जांभुळ, सातारा स्ट्रॉबेरी, रायगड मध्ये आंबा आणि पुणे जिल्ह्यात मधापासून वाईन बनवणारे उद्योग आहेत.

मात्र केवळ द्राक्ष वायनरीजना या अनुदानाचा निर्णय होता. महाराष्ट्र फळ वाईनरीजचा जन्मदाता असूनही वाईनमध्ये शासनाकडून भेदभाव केला जात होता. राज्याचे उद्योग संचालनालयाकडून केवळ द्राक्ष वायनरीजना हे अनुदान दिले जात होते. ज्याची रक्कम वार्षिक १०७ कोटींवर गेली आहे.त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी हे धोरण राबवले जात आहे, असा आरोप कोकण व विदर्भातील शेतकरी अनेक वर्ष करत होते. पण आता अस्तित्वासाठी झगडणाऱ्या फळ, फूल व मध वाईन उत्पादकांना या प्रोत्सासह अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

FAQs (Marathi)

1. नवीन धोरण कशासाठी आणले जात आहे?
फळे, फुले व मधापासून वाईन उत्पादनाला चालना देण्यासाठी एकात्मिक प्रोत्साहन अनुदान धोरण आणले जात आहे.

2. हा मुद्दा विधानसभेत कोणी उपस्थित केला?
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.

3. सरकारची भूमिका काय आहे?
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अनुदानाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले.

4. कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?
पालघर, नाशिक, सातारा, रायगड आणि पुणे जिल्ह्यांतील उद्योगांना लाभ होऊ शकतो.

5. शेतकऱ्यांना कसा फायदा होईल?
स्थानिक फळे व मधाला प्रक्रिया उद्योग मिळाल्याने शेतमालाला अधिक बाजारपेठ आणि चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT