fadnavis Government : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महापालिका व नगरपालिकेतील स्वीकृत पॅटर्न ZP तही, रत्नागिरीत घोषणेआधीच मोर्चे बांधणीला वेग

devendra fadnavis Government approved approval member in zilla parishad and panchayat samiti : राज्यातील महापालिका आणि नगरपालिकामध्ये स्वीकृत सदस्य निवडीची पद्धत असून त्याचपद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य असावेत यासाठी महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे.
Ratnagiri Zilla Parishad, devendra fadnavis
Ratnagiri Zilla Parishad, devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मागणीनुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नेमण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

  2. रत्नागिरी जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ५६ वरून ६२ आणि पंचायत समित्यांची ११२ वरून १३६ होण्याची शक्यता आहे.

  3. देवेंद्र फडणवीस सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर होण्याची शक्यता आहे.

Ratnagiri News : राज्यातील महानगर पालिकांप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य घेण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे आता कोकणातील रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य वाढणार आहेत. जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ५६ वरून ६२ आणि जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांची सदस्यसंख्या ११२ वरून १३६ होणार आहे. यामुळे स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीनंतर ही प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील महापालिका आणि नगरपालिकामध्ये स्वीकृत सदस्य निवडीची पद्धत असून ती पद्धत राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही राबवण्यात यावी अशी मागणी होत होती. याप्रमाणे अधिनियमात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

या मागणीला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे. ज्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. यामुळे जिल्हा पंचायत समित्यांच्या परिषद, सदस्यसंख्येत वाढ होणार आहे. या निर्णयामुळे राजकीय पक्षांना आणखी काही कार्यकत्यांना मिनी मंत्रालयात आपल्या कार्यकर्त्यांना स्थान देता येणार असून बंडखोरांसह नाराजांना खूश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ratnagiri Zilla Parishad, devendra fadnavis
Pune Zilla Parishad : राज्य सरकारने तब्बल 29 वर्षांनी बदललेल्या 'त्या' निर्णयामुळे जिल्हा परिषदेला 7 स्वीकृत सदस्य मिळणार

नव्या नियमानुसार जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्येच्या १० टके, तर पंचायत समित्यांत २० टक्क्यांपर्यंत स्वीकृत सदस्यांची निवड करता येणार आहे. आतापर्यंत ही तरतूद महापालिका व नगरपालिकांपुरती मर्यादित होती. पण आता महापालिका व नगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा पॅटर्न जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये राबवला जाणार आहे.

या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य वाढणार आहेत. या निर्णयाप्रमाणे जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ६२ आणि जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांची सदस्यसंख्या १३६ होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ५६ असून नव्या नियमाप्रमाणे येथे ६ स्वीकृत सदस्य वाढतील. तर पंचायत समित्यांमध्ये सध्या ११२ सदस्य असून यात २४ सदस्यांची भर पडणार आहे.

दरम्यान, १० मार्च रोजी पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापतींच्या निवडी होणार असून यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडेल. सत्तास्थापन झाल्यानंतर स्वीकृत सदस्य नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयाची चाहूल लागताच स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला असून इच्छुक कार्यकत्यांकडून मोर्चे बांधणी होताना दिसत आहे.

अध्यक्षपदाची निवड

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अध्यक्ष व सभापती निवडीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून अध्यक्षपदाची निवड १६ मार्चला होणार आहे. पण त्याआधी पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे. ही निवड ९ मार्चला होणार असून यानंतर स्वीकृत सदस्यांची नेमणूक होण्याची शक्यता आहे.

Ratnagiri Zilla Parishad, devendra fadnavis
Zilla Parishad Election : सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्रासाठी मोठी अपडेट; नाशिक, बीड, नागपूरसह 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे फटाके दिवाळीतच?

FAQs :

1. निर्णय नेमका काय आहे?
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नेमण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

2. या निर्णयामुळे कोणत्या जिल्ह्यावर परिणाम होणार?
रत्नागिरी जिल्ह्यात सदस्यसंख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

3. सदस्यसंख्या किती वाढणार आहे?
जिल्हा परिषदेत ५६ वरून ६२ आणि पंचायत समित्यांत ११२ वरून १३६ सदस्य होऊ शकतात.

4. हा निर्णय कोणी सुचवला होता?
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मागणी मुख्यमंत्रीांकडे केली होती.

5. अंमलबजावणी कधी होणार?
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com