रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर पहिल्यांदाच भाजपचा सभापती निवडून आला.
काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यावर भाजपने विजय मिळवत इतिहास रचला.
या निकालामुळे रत्नागिरी व कोकणातील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे.
BJP News : तळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात भाजपसाठी ऐतिहासिक क्षण ठरला असून येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर पहिल्यांदाच सभापतिपदी भाजपच्या नेत्याची निवड झाली आहे. सहकार पॅनेलचे संचालक आणि भाजपचे पदाधिकारी संदीप सुर्वे यांची सभापतिपदी एकमताने निवड करण्यात असून ही निवड बिनविरोध झालीय. ही निवड झाल्याने आगामी स्थानिकच्या आधीच भाजपच्या गोटात नव चैत्यन्य निर्माण झाले आहे.
नुकताच जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदाची निवडणूक पार पडली. ही निवडणूक सहकार पॅनेलचे प्रमुख आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी बाजारसमितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या वाट्याला सभापती पद आले आहे.
यावेळी माजी आमदार राजन साळवी, बाजार समितीचे संचालक रमेश दळवी, बाळू ढवळे, जयंद्रथ खताते व संचालकांसह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग घोसाळे, माजी जि.प. उपाध्यक्ष उदय बने, बाबू मयेकर, राकेश साळवी, संजय साळवी, नाचणेचे माजी सरपंच संतोष सावंत, माजी पं.स. सभापती प्रकाश रसाळ यांच्यासह नाचणे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुर्वे हे यापूर्वी दोन वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी संचालक म्हणून चांगली कामगिरी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती झालेले सुर्वे यांनी काही महिन्यापूर्वीच मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान आता आगामी स्थानिकच्या आधीच रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या पदाधिकारीची कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती म्हणून निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकार्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीनंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी, कृषी क्षेत्रातील या नियुक्तीमुळे भाजप संघटनेला नवे बळ मिळणार असून नवी दिशाही मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
प्र.१: रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोण निवडून आले?
उ. पहिल्यांदाच भाजपचा नेता सभापतीपदी निवडून आला.
प्र.२: यापूर्वी ही जागा कोणत्या पक्षाकडे होती?
उ. बहुतांश वेळा काँग्रेसकडे या समितीची सत्ता होती.
प्र.३: भाजपचा हा विजय ऐतिहासिक का मानला जातो?
उ. कारण पहिल्यांदाच भाजपने रत्नागिरी APMC वर सभापतीपद मिळवलं आहे.
प्र.४: या विजयाचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
उ. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवल्याने कोकणातील समीकरणात मोठा बदल होऊ शकतो.
प्र.५: ही निवडणूक कितपत महत्वाची आहे?
उ. शेतकरी, बाजार व्यवस्थापन आणि स्थानिक राजकीय वर्चस्वासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.