Raj Thackeray and Uddhav Thackeray  Sarkarnama
कोकण

Ratnagiri Politics: कोकणातील राजकारण तापलं; दोन्ही ठाकरेंच्या तोफा एकाचवेळी धडाडणार!

Raj Thackeray and Uddhav Thackeray : कोकणात एकाच दिवशी ठाकरे बंधुंच्या दोन जाहिर सभा होत असल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या सभेकडे लागले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर असून त्यांची महाडमध्ये जाहीर सभा होणार आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही आजच रत्नागिरीमध्ये सभा आहे.

त्यामुळे या सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोकणात एकाच दिवशी ठाकरे बंधुंच्या दोन जाहिर सभा होत असल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेत महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप या हजारो समर्थकांसह शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश करणार आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील बारसू येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये जाहीर सभा होणार आहे.

तर दुसरीकडे राज ठाकरे यांची देखील कोकणात सभा होत आहे. या सभेच्या माध्यमातून कोकणात मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्हीही सभेला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार? तर उद्धव ठाकरे यांचा निशाणा कोणावर असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT