Sharad Pawar : सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला तरी शिंदे-फडणवीस सरकारवर परिणाम होणार नाही : पवारांचे महत्वपूर्ण विधान

भाजपला पर्याय देण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत, त्यात आपला सहभाग असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Sharad Pawar-Eknath shinde-Devendra Fadnavis
Sharad Pawar-Eknath shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

बारामती : सर्वोच्च न्यायालयातील निकाल जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लागला तरी सरकारवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण भाजप आणि शिंदे सरकारकडे बहुमत आहे, त्यामुळे सरकारवर परिणाम होईल, असे आपल्याला वाटत नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. (Even if Supreme Court verdict goes against it, it will not affect state government : Sharad Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर पवार (Sharad Pawar) बारामतीत आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे भाकीत वर्तविले. ते म्हणाले की आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पातळीवर विरोधकांची एकजूट होण्याची प्रक्रीया सुरु झालेली असताना मी बाजूला होणे योग्य नाही, असे अनेक मान्यवरांचे मत होते. तसेच, कार्यकर्त्यांची तीव्र भावना विचारात घेता मी राष्ट्रवादीच्या (NCP) अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा निर्णय मागे घेतला. भाजपला पर्याय देण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत, त्यात आपला सहभाग असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar-Eknath shinde-Devendra Fadnavis
Basavaraj Bommai News : कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले : ‘महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना; आम्ही त्यांचा बंदोबस्त करू’

शरद पवार यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना या बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पक्षाच्या अध्यक्षपदाच्या भूमिकेपासून दूर जाण्यासाठी मी तयार झालो होतो. गेल्या साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी लोकसभा, विधानसभा, राज्यसभा यापैकी कोठेतरी काम केले आहे. देशात सातत्याने ५६ वर्ष अशा पद्धतीने निवडून आलेले लोक मला तरी माहिती नाहीत.

बारामतीसह राज्य व देशातील लोकांनी आशीर्वाद दिल्यानेच मी ५६ वर्ष सक्रीय राजकारण करु शकलो. माझी अजूनही राज्यसभेची तीन वर्षे शिल्लक आहेत. गेल्या काही दिवसांपासून मला असे वाटत होते की, आपण पर्याय तयार करणे गरजेचे आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar-Eknath shinde-Devendra Fadnavis
Dudhani Bazar Samiti Vishleshan : भल्या भल्यांना जमलं नाही; ते भाजपच्या सचिन कल्याणशेट्टींनी करून दाखवलं!

गेल्या अनेक वर्षांपासून मीच जबाबदारी घेतो आहे, पण नव्या लोकांना संधी द्यायला पाहिजे व त्यांनीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मला वाटत होते. मी बाजूला होणे, याचा अर्थ घरी बसणे असा नाही. लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये राहणे, त्यांचे प्रश्न सोडविणे, हा मनाशी निश्चय करुन मी अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाच्या कार्यकर्त्यांची इतकी तीव्र प्रतिक्रीया येईल, अस मला कधी वाटल नाही, हे मला कबूल केल पाहिजे. त्या बाबतीत माझा अंदाज चुकला.

Sharad Pawar-Eknath shinde-Devendra Fadnavis
Khed Bazar Samiti : खेड बाजार समिती निवडणुकीत ५० कोटींच्या उलाढाली चर्चा; खुद्द आमदार मोहितेंना बसला पाकिट संस्कृतीचा फटका

एक दोन दिवस कार्यकर्ते विरोध करतील, नंतर आपण समजूत काढू असा माझा अंदाज होता. पण, समजून घ्यायला कोणी तयार नव्हतं. आसामपासून केरळपर्यंत सर्वच प्रमुख लोकांच्या प्रतिक्रीया आल्या. यातही वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका आहेत. विरोधकांची एकी होताना मी बाजूला होणे योग्य नव्हते. अनेक मान्यवरांच्या मतांचा आदर राखून मी हा निर्णय घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com