ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे सेना आणि भाजप युतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कळवा परिसरातील शिंदे सेनेचे माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी ५० वर्षांच्या कामानंतरही अन्याय झाल्याचा आरोप केला आहे.
उमेदवारी वाटपावरून पक्षांतर्गत नाराजी उफाळून येत असल्याचे चित्र दिसत आहे.
Thane municipal elections News : राहुल क्षीरसागर
ठाणे पालिका निवडणुकीत युती म्हणून शिंदे सेना आणि भाजप निवडणुकीला समोर जात आहे. त्यामुळे अनेक कमी जागा जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यान उमेदवारी देत न्याय देण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र राज्याभर अन्याय झालाची टीका कार्यकर्त्यांकडून भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर होताना दिसत आहे. अशातच कळवा परिसरात देखील असाच संताप शिंदे सेनेचे माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी व्यक्त केला असून त्यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी, आपण गेली पन्नास वर्षे झोकून देऊन पसाक्षाठी काम करूनही आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे.
१९८६ पासून मी कळव्यात शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्या काळात इथे शिवसेनेचं नाव घेणारंही कुणी नव्हतं. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावावर मी संघटना उभी केली, असल्याचे माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी सांगितले.
तसेच या लढ्यात आमच्या घरांवर हल्ले झाले, आम्ही मारहाण सहन केली. पण तरीही शिवसेना सोडली नाही, अशी आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली. निष्ठावंत शिवसैनिकांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप करत साप्ते म्हणाले, दिघे साहेबांच्या विचारांवर वाढलेल्या शिवसैनिकांना बाजूला सारून नव्याने आलेल्यांना जवळ केलं जात आहे. अख्खं गाव जवळ केलं. पण खऱ्या शिवसैनिकांना पदापासून वंचित ठेवलं गेलं. हा आमच्यावर केलेला अन्याय आहे.
१९९७ पासून सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या साप्ते यांनी पाचव्यांदा निवडणूक लढवण्यासाठी संपूर्ण तयारी केली होती. सकाळपर्यंत माझा एबी फॉर्म तयार असल्याची माहिती होती. मला तसा निरोपही आला होता. मात्र एबी फॉर्म देऊन तो अचानक स्थगित ठेवण्यात आला आणि दुसऱ्यालाच उमेदवारी देण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. सर्वेक्षणाच्या नावाखाली मी कमी पडलो असेन, तर ते मला थेट सांगायला हवं होतं. पन्नास वर्षांचं रात्रंदिवसाचं काम कुणालाच दिसलं नाही का? असा थेट सवाल त्यांनी पक्ष नेतृत्वाला केला.
मला खुर्चीचा मोह नाही
आपण पदासाठी नव्हे, तर जनतेसाठी काम केल्याचं स्पष्ट करत साप्ते म्हणाले, मला खुर्चीचा मोह नाही. उमेदवारी मिळाली नाही तरी मी जनसेवक म्हणून काम करत राहीन. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मुशीत घडलेला शिवसैनिक म्हणून त्यांचा वसा पुढे नेण्याचा निर्धार कायम आहे.
1. राजेंद्र साप्ते यांनी कोणता आरोप केला आहे?
→ कळवा परिसरात ५० वर्षे काम करूनही आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
2. ठाणे महापालिका निवडणूक कोणत्या युतीत लढवली जात आहे?
→ शिंदे सेना आणि भाजप युती म्हणून निवडणूक लढवत आहेत.
3. कळवा परिसरात कोणता राजकीय वाद निर्माण झाला आहे?
→ उमेदवारी वाटपावरून शिंदे सेनेत नाराजी आणि अन्यायाचे आरोप झाले आहेत.
4. या आरोपांचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
→ पक्षांतर्गत असंतोषामुळे प्रचार आणि संघटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
5. राजेंद्र साप्ते सध्या कोणत्या भूमिकेत आहेत?
→ ते शिंदे सेनेचे माजी नगरसेवक असून सध्या पक्षाच्या निर्णयाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.