Nitesh Rane Sarkarnama
कोकण

Gram Panchayat Election Results : कणकवली-देवगडमध्ये नितेश राणेंचे वर्चस्व कायम; बेळणे ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचा झेंडा

Sachin Waghmare

Maharashtra Gram Panchayat Election Results : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अनेक ग्रामपंचायतीत विजय मिळवत पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कणकवली-देवगड विधानसभा मतदारसंघातील देवगड आणि कणकवलीमधील अकरापैकी आठ ग्रामपंचायती भाजपने, दोन ग्रामपंचायतीत ठाकरे सेनेने, तर एक ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीने मिळवली आहे.

कणकवली- देवगड या मतदारसंघात आमदार नितेश राणेंचं वर्चस्व कायम राहिल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे कणकवली तालुक्यातील बेळणे ग्रामपंचायत निवडणूक भाजप व ठाकरे सेनेने प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये बेळणे ग्रामपंचायत भाजपकडून हिसकावून घेण्यात ठाकरे सेनेला यश आले आहे.

कणकवली- देवगड विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत नितेश राणे यांचं वर्चस्व गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. देवगड आणि कणकवलीमधील अकरापैकी आठ ग्रामपंचायतीमध्ये भाजपाने जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या वेळी अकरापैकी आठ ग्रामपंचायतीत विजय मिळवत नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

राणेंचं वर्चस्व कायम

गेली अनेक वर्षांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्चस्व कायम असल्याचं दिसून येतं. राणे शिवसेनेत होते तेव्हा बहुतांशी निवडणुकीत राणे सेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावत. त्यानंतर राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजप-सेनेला धूळ चारण्यात राणेंनी बहुतांशी वेळेला यश मिळवले होते. तोच कित्ता राणे आता भाजपमध्ये आल्यानंतरही गिरवत आहेत. त्यांनी ग्रामपंचायतीपासून सर्वच निवडणुकीत भाजपला यश मिळवून दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT