Gram Panchayat Election Result 2023 : दीपक केसरकरांना सावंतवाडीत दणका; भाजप, ठाकरे गटाचे वर्चस्व

Gram Panchayat Election Results LIVE Updates : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भोपळासुद्धा फोडता आलेला नाही.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar Sarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून, त्यामध्ये दोडामार्गमध्ये तीन ग्रामपंचायतींसाठी आणि वेंगुर्लेमध्ये चार ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी झाली. यामध्ये शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.

या ठिकाणी भाजप, ठाकरे गटाच्या सेनेने वर्चस्व मिळवले आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. त्यामुळे हा दीपक केसरकर यांना धक्का मानला जात आहे.

कोकणातील ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये काही ठिकाणी सत्ताधारी शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्लेमधील चारपैकी तीन ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे, तर एका ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाच्या सेनेने वर्चस्व मिळवले. या ठिकाणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या शिवसेना शिंदे गटाला एकही ग्रामपंचायत जिंकता आलेली नाही.

Deepak Kesarkar
Gram Panchayat Election Results : शिरसाटांच्या मतदारसंघात विरोधकांचा गुलाल, सरपंचपदासह ग्रामपंचायत ताब्यात...

दोडामार्गमध्ये तीनपैकी भारतीय जनता पक्षाने एक, तर ग्रामविकास आघाडीने दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील एकूण सात ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायती या भारतीय जनता पक्षाकडे, तर एक ग्रामपंचायत उद्धव ठाकरे शिवसेनेकडे, तर दोन ग्रामपंचायत या ग्रामविकास आघाडीकडे गेल्या आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेला भोपळाही फुटला नाही

या ठिकाणी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. त्यामुळे हा दीपक केसरकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या सात ठिकाणी मंत्री दीपक केसरकर यांनी निवडणूक रिंगणात पॅनेल उतरविले होते. मात्र, त्यांना यश मिळवता आले नाही.

Edited By - Ganesh Thombare

Deepak Kesarkar
Gram Panchayat Election Results : "...म्हणून शरद पवार गटाची ही अवस्था", मुश्रीफांनी ग्रामपंचायत निकालावरून लगावले टोले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com