Grampanchayat Election, Udaya Samant
Grampanchayat Election, Udaya Samant 
कोकण

Grampanchayat Election : उदय सामंतांचा गड ढासळला; महाविकास आघाडीचा मोठा विजय

सरकारनामा ब्यूरो

Grampanchayat Election : राज्यात रविवारी जवळपास विविध जिल्ह्यातील एक हजार १६६ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. आज (ता. १७) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला रायगड पोठोपाठ रत्नागिरीतही मोठा धक्का बसला आहे.

रत्नागिरीत उद्योग मंत्री उदय सामंत (udaya samant ) यांना मोठा धक्का बसला आहे. सामंत यांच्या पॅनेलवर महाविकास आघाडीचे पॅनेल वरचढ ठरले आहे. रत्नागिरी जिल्ह्याीतल सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरगावमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या फरीदा काझी या विजयी झाल्या आहे.

यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काझी यांच्या विजयानंतर मविआच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. त्यानंतर पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झाला आहे. या ठिकाणी सरपंच म्हणून ठाकरे गटाच्या ममता जोशी यांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली. जोशी यांचा विजय हा सामंत यांच्या गटास धक्का देणार आहे.

तसेच फणसोप ग्रामपंचायतीच्या निकालातही ठाकरे गटाची सत्ता आली. येथे राधिका साळवी सरपंच म्हणून विजयी झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीवर 11 पैकी 10 सदस्य ठाकरे गटाचे निवडून आले आहे. त्यामुळे मोठ्या फरकाने ठाकरे गटाणे येथील सत्ता राखली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT