Bhaskar Jadhav-Ramdas Kadam
Bhaskar Jadhav-Ramdas Kadam Sarkarnama
कोकण

Kadam Vs Jadhav : गुहागरचा पुढचा आमदार शिंदे गटाचा करण्याची जबाबदारी माझी : रामदास कदमांचे जाधवांना चॅलेंज

सरकारनामा ब्यूरो

खेड (जि. रत्नागिरी) : कोणी कितीही वल्गना केल्या तरी आगामी विधानसभा निवडणुकीत गुहागर (Guhagar) मतदारसंघाचा आमदार हा शिंदे गटाचाच (Eknath shinde Group) असेल. त्याची जबाबदारी मी घेतली आहे, अशा शब्दांत माजी मंत्री तथा शिंदे गटाचे कोकणातील (Konkan) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना आव्हान दिले. (Guhagar's next MLA from Shinde group : Ramdas Kadam)

नांदगाव येथील मेळाव्यात रामदास कदम यांनी शिवसेना (उद्वव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी पालकमंत्री अनिल परब तसेच गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका केली. याच मेळाव्यात त्यांनी भास्कर जाधव यांना निवडून येण्याचे आव्हान दिले.

शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर आज (ता. १३ जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा पहिलाच मेळावा खेड तालुक्यातील परंतु गुहागर मतदार संघातील नांदगाव येथे झाला. याच मेळाव्यात कदम यांनी ॲड. अनिल परब आणि भास्कर जाधव यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली.

रामदास कदम म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघाचा आमदार हा बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाचाच असेल. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. त्यामुळे कुणीही किती ही वल्गना करो, विजयाचा दावा करो आमदार हा शिंदे गटाचाच असेल, ही काळ्या दगडावरचीही रेष आहे.

या सभेत गुहागर मतदारसंघातील सात सरपंच व तिसंगी, मोहाने, संगलट येथील ग्रामस्थांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले सहदेव बेटकर यांनी देखील शिंदे गटातून पुढील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे या वेळी जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT