Tukaram Mundhe Sarkarnama
कोकण

Tukaram Mundhe : रायगड ZP मध्ये खळबळ: तुकाराम मुंढेंच्या आदेशामुळे तब्बल १६४ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले; अहवाल येताच...

raigad zilla parishad employees Case : राज्याच्या २८ जिल्हा परिषदांमध्ये बनावट प्रमाणपत्रांचा पर्दाफाश झाला असून बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात दिव्यांग कल्याण विभागाने सर्व जिल्हा परिषदांना व्यापक पडताळणीचे आदेश दिले आहेत.

Aslam Shanedivan

  1. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार घेतल्यानंतर राज्यभर दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी सुरू केली आहे.

  2. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी UDID कार्ड आणि प्रमाणपत्रांची फेरतपासणी सुरू आहे.

  3. रायगड जिल्हा परिषदेत व्यापक पडताळणीत तब्बल १६४ कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

raigad News : IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार घेतल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी आणि युडीआयडी कार्ड फेरतपासणी केली जात आहे. मुंढे यांच्या आदेशानंतर दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना व्यापक पडताळणीचे निर्देश दिले आहेत. एकीकडे सांगली जिल्हा परिषदेमधील 13 शिक्षक आणि एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाईने राज्यभर खळबळ उडाली असतानाच आता रायगडमध्ये प्रशासनाला हादरा बसणारी बातमी आली आहे. येथे जिल्हा परिषदेच्या व्यापक पडताळणीत तब्बत १६४ कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा तुकाराम मुंढे यांनी उगारला आहे. ४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असणे, प्रमाणपत्र नसणे, बनावट प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत रुजू होत दिव्यांगांच्या योजनांसह इतर बाबींवर डल्ला मारल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

यानंतरच आता राज्यातील सर्व मंत्र्यालयांसह सर्व जिल्हा परिषदांना विभागातील दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी आणि युडीआयडी कार्ड फेरतपासणीचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत. तसेच त्याचे अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी व आरोग्य तपासणी केली जात आहे. या तपासणीत जिल्हा परिषदेतील १६४ दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या सर्वांवर संशयित दिव्यांग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर या सर्वांची फेर पडताळणी ठाणे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात होणार आहे. यामुळे आता रायगडसह कोकणात खळबळ उडाली आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरु केली आहे. जिल्हा परिषदेमध्ये ३१८ दिव्यांग कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र, आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे १६४ दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कर्मचाऱ्यांवर संशयित दिव्यांगाचा ठपका ठेवण्यात आला असून पडताळणी ठाणे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात केली जाणार आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून आलेल्या अहवालानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान खऱ्या दिव्यांगांना न्याय देण्याच्या भूमिकेतून तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशाने सांगली जिल्हा परिषदेमधील 13 शिक्षक आणि एका कर्मचाऱ्याची विकेट पडली आहे. वारंवार सूचना देऊन देखील दिव्यांग ओळखपत्र व युडीआयडी कार्ड सादर न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. तर शिक्षण विभाग हादरले असून राज्यात या निलंबनाची जोरदार चर्चा सुरू आहे. यातच आता रायगड जिल्हा परिषदेतील तब्बल १६४ कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने जिल्हा परिषद प्रशासन देखील चिंतेत आले आहे.

FAQs :

1. दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी का सुरू करण्यात आली आहे?
बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

2. या मोहिमेचे आदेश कोणी दिले?
दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव IAS तुकाराम मुंढे यांनी ही पडताळणी मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले.

3. रायगड जिल्हा परिषदेत किती कर्मचारी संशयित आहेत?
व्यापक पडताळणीत १६४ कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

4. UDID कार्ड म्हणजे काय?
UDID म्हणजे Unique Disability ID Card जे दिव्यांग व्यक्तींच्या अधिकृत ओळखीचे प्रमाणपत्र असते.

5. सांगली जिल्ह्यात काय कारवाई झाली होती?
सांगली जिल्हा परिषदेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात १३ शिक्षक आणि एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT