Uday Samant
Uday Samant Sarkarnama
कोकण

Uday Samant News : राजन साळवींबाबत उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

सरकारनामा ब्युरो

Konkan Refinery Project : कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीसाठी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत एकत्र आले होते. मात्र ''आमच्या या एकत्र येण्याला कोणीही राजकीय रंग देऊ नये'', असं स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं. ते रिफायनरी प्रकल्पाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.

उदय सामंत म्हणाले, ''बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात आज बैठक झाली आहे. या बैठकीला राजन साळवी उपस्थित राहिले. तर खासदार विनायक राऊत हे उपस्थित राहिले नाहीत. मात्र त्यांनी या संदर्भातलं पत्र पाठवलं होतं. असं स्पष्टीकरण देत आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे त्या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत, त्यामुळे त्यांना जनतेच्या भावना माहिती'' असल्याचं सामंत म्हणाले.

''जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचा उद्योगविभाग काम करत आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांवर दबाव टाकून आम्ही करणार नाही. तर शेतकऱ्यांच्या भावना आधी समजून घेतल्या जातील. या प्रकल्पामुळे एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. कोयणा धरणाच्या पाण्याचा उपयोग या प्रकल्पासाठी करणार'' असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं. या रिफायनरी प्रकल्पासंदर्भात बोलताना ''रिफानरी प्रकल्पाच्या संदर्भातल्या बैठकीचं निमंत्रण मला आल्याने मी बैठकीत उपस्थित होतो, असं स्पष्टीकरण राजन साळवींनी दिलं.

नाणार रिफायनरी प्रकल्पाचा (Refinery Project) विरोध अनेक संघटनांनी केला होता. या प्रकल्पाच्या विरोधात अनेक संघटना देखील मैदानात उतरल्या होत्या. मात्र आता या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तृळात होत्या. आज शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) आणि राजन साळवी हे या बैठकीत एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT