Bharat Jodo yatra : 'भारत जोडो यात्रेत पैसे देऊन कलाकारांना आणले!'

Bharat Jodo yatra : हा पप्पू कधी पास नाही होणार!
Rahul Gandhi Riya Sen
Rahul Gandhi Riya SenSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात मार्गक्रमण करणाऱ्या भारत जोडो यात्रेवर भाजप नेते नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रातला मुक्काम संपला असून आता यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करत आहे. दरम्यान गुजरात निवडणुकांच्या प्रचारासाठी राहुल गांधी गुजरातेत पोहचले आहेत. यावरून आता नितेश राणेंनी राहुल गांधी यांच्यावर टिका केली आहे.

Rahul Gandhi Riya Sen
Bharat Jodo : विक्रमादित्य देशमुखांनी राहुल गांधींना दिली अनोखी भेट....

‘भारत जोडो यात्रे’त अनेक बॅालिवूड सिने अभिनेते - अभिनेत्रींनी उपस्थिती लावली. मात्र त्यांच्या भारत जोडो यात्रेच्या सहभागावर नितेश राणेंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यात्रेत येण्यासाठी कलाकारांना पैसे दिले जात असल्याचा गंभीर आरोप नितेश राणेंनी केला आहे.

“भारत जोडो यात्रा म्हणजे यांची नौंटकी चालू आहे. ‘भारत जोडो यात्रे’त आलेले कलाकार पैसे देऊन आणले जात आहेत. यासाठी भारत जोडो यात्रेच्या टीमकडून एक मॅसेज पाठवल्याचं समोर आलं आहे. यात्रेदरम्यान १५ मिनिटांसाठी चालण्यासाठी, राहुल गांधींना समर्थन देत असलेले कलाकार पैसे देऊन आणण्यात आले का?,” असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे.

Rahul Gandhi Riya Sen
चौकशीसाठी गेलेल्या भाजप आमदारास नागरिकांनी कपडे फाटेपर्यंत मारले

नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. मात्र यात कोणाचंही नाव आणि नंबर दिसत नाही. राणे यांनी लिहलं की, “भारत जोडो यात्रेत राहुल गांधींबरोबर चालण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले जातात, याचा हा पुरावा. सब गोलमाल है भाई, हा पप्पू कधी पास नाही होणार,” असेही नितेश राणे यांनी म्हंटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com