Irshalgad Landslide Incident : Sarkarnama
कोकण

Raigad Irshalgad Landslide: ७५ जणांना वाचवण्यात यश, पाच जणांचा मृत्यू; फडणवीसांनी दिली माहिती !

Irshalgad Landslide Incident : "मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल.."

सरकारनामा ब्यूरो

Raigad Landslide Latest Updates: पावसाने झोडपून काढल्यामुळे कोकण परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेलेल्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi Incident) दरड कोसळली आहे. यात अंदाजे सुमारे शंभर ते दीडशे लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

फडणवीस ट्विट करत म्हणाले, "रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."

"ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे," असे फडणवीस म्हणाले.

"प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल, तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत," अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT