Khalapur Irshalgad Landslide  Sarkarnama
कोकण

Irshalwadi landslide : 'इर्शाळवाडी' मुळे वाढदिवस साजरा न करण्याचा अजितदादांचा निर्णय ; बुट्टे-पाटील सत्कार घेणार नाहीत..

Khalapur Irshalgad Landslide : 22 जुलैला अजित पवार यांचा वाढदिवस असतो.

सरकारनामा ब्यूरो

Pimpri : माळीण (ता.आंबेगाव,जि.पुणे) दुर्घटनेची (३० जुलै २०१४) पुनरावृत्ती यावर्षी इर्शाळवाडी (ता. खालापूर,जि.रायगड) येथे जुलै महिन्यातच काल (ता.१९) झाली.या दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला यावर्षीचा वाढदिवस (ता.२२)साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी जय्यत तयारी केली होती.

जुलै महिन्यातच २०१४ ला इर्शाळगडपेक्षाही भीषण दुर्घटना माळीण येथे घडली होती.संपूर्ण माळीण गावावरच शेजारचा डोंगरकडा कोसळून १५१ गावकऱ्यांचा बळी गेला होता. इर्शाळगड गावातील वस्तीवर दरड कोसळली. या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यातून त्यांनी यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आज घेतला. 22 जुलैला त्यांचा वाढदिवस असतो.

राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर तो साजरा करतात. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष बुट्टेंचा सत्कार न घेण्याचा निर्णय

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ७० जिल्हाध्यक्ष जाहीर केले. त्यात पुणे जिल्ह्यासाठी चौथे अध्यक्ष नव्याने देण्यात आले. तेथे (मावळ) पुणे जिल्हा नियोजन समितीतील निमंत्रित सदस्य आणि पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर कालपासून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. सत्कार केले जात आहेत. मात्र, कालच्या ईर्शाळवाडी दरड दुर्घटनेमुळे त्यांनीही आज सत्कार न घेण्याचा ठरवले. तसे त्यांनी कळविले आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT