Irshalwadi Landslide Update: इर्शाळवाडीतून ८० जणांना बाहेर काढले ; दहा जणांचा मृत्यू

Irshalwadi Landslide Rescue Operation: मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत
Irshalgad Landslide Incident
Irshalgad Landslide Incident Sarkarnama
Published on
Updated on

Raigad Irshalgad Accident News: रायगडमधील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल (बुधवारी) मध्यरात्री घडली. यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले. ते विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलत होते.

"या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या परिसरात मुसळधार पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. येथे एकूण 48 कुटुंब येथे आहेत.

Irshalgad Landslide Incident
Dheeraj Ghate News : पक्षासाठी धीरज घाटेंकडे पुण्याची जबाबदारी; कशी पेलणार आव्हाने ?

सुमारे ८० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्यात येत आहे. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही येथील परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत," असे फडणवीस यांनी सांगितले.

Irshalgad Landslide Incident
Marathi Films Artists Protest: "बा विठ्ठला" मराठी चित्रपटांना थिएटर मिळू दे ! ; शिंदे सरकारच्या विरोधात निर्माते, कलाकारांचे विठुरायाला साकडे

"बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारात ही घटना घडली. मासेमारी करुन नागरिक घरी आले होते. त्यानंतर ही घटना घडली. गिरीश महाजन, दादा भूसे आदी मंत्रीमंडळातील सहकारी त्याठिकाणी पोहचले आहेत. रस्ता नसल्याने त्या ठिकाणी वाहने जाऊ शकत नाहीत. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत," असे फडणवीस म्हणाले.

जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची भीती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मंत्री उदय सामंत, दादा भूसे, याठिकाणी पोहचले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे.

काल रात्री अंधार व पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसून सर्वत्र चिखल झाला आहे. चिखल तुडवून गावापर्यंत बचावकार्यासाठी जावे लागत आहेत. रात्री मदतीसाठी जात असताना अग्निशमनदलाच्या एका जवानाचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com