NItesh Rane  Sarkarnama
कोकण

'मी देखील गृहमंत्री होवू शकतो'; असं तर नितेश राणेंना सुचवायचे नसेल ना?

Nitesh Rane | Shivsena : नितेश राणेंना अटक आणि कोठडी

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर शरण आले. त्यानंतर त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. न्यायालयाने सध्या त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यामुळे त्यांचा जामीनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मात्र या दरम्यान राणे यांनी ट्विट करुन महाविकास आघाडी त्यातही शिवसेनेला इशारा दिला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करुन २००९ मध्ये पी. चिदंबरम गृहमंत्री असताना अमित शहा यांना अटक केल्याची घटना सांगितली आहे. तर १० वर्षांनंतर अमित शहा गृहमंत्री असताना पी. चिदंबरम यांना अटक केले होते असे सांगितले आहे. त्यासोबत "समय बडा बलवान होता है, इन्सान खामो खा गुरुर करता है" असे कॅप्शन लिहित शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे.

या सोबतच या ट्विटमधून मी देखील गृहमंत्री होवू शकतो असे तर नितेश राणेंना सुचवायचे नसेल ना? अशीही चर्चा आता समाजमाध्यमांमध्ये सुरु झाली आहे. गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या अमित शहा यांना जुलै २०१० साली सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. त्यावेळी केंद्रात गृहमंत्री असलेल्या पी. चिदंबरम यांचा या कारवाईसाठी दबाव असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या दरम्यान शहा यांना गुजरातमध्ये येण्यास देखील बंदी घालण्यात आली होती.

त्यानंतर १० वर्षांनंतर म्हणजे २०२० मध्ये अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री अमित शहा असताना जुन २०२० मध्ये पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मिडिया प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. त्यामुळे त्यावेळी १० वर्षांचे एक वर्तुळ पूर्ण झाले अशी चर्चा देशाच्या राजकारणात सुरु होती. त्यानंतर आता आज हा घटनाक्रम सांगत नितेश राणे यांनी समय बलवान होता है, असे सांगितले आहे. त्यामुळे मी देखील भविष्यात गृहमंत्री होवू शकतो आणि हे वर्तुळ पूर्ण होवू शकते असे तर नितेश राणे यांना सुचवायचे नाही ना अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नितेश राणे यांचा यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने राणेंचा जामीन फेटाळला होता. यानंतर राणेंच्या वतीने ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यात आल्याचे आता मानेशिंदे यांनी सांगितले. यानंतर राणे हे स्थानिक न्यायालयात शरण आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT