सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने राणेंचा जामीन फेटाळला होता. यानंतर राणेंच्या वतीने ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यात आल्याचे आता मानेशिंदे यांनीच सांगितले आहे. यानंतर राणे हे स्थानिक न्यायालयात शरण आले असून, त्यांना लवकरच अटक होणार असल्याचे समजते.
आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर काल न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्यासमोर सुनावणी झाली. पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडली होती. न्यायालयाने अखेर राणेंचा जामीन अर्ज फेटाळला होता. यामुळे राणेंच्या वतीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. आता हा अर्ज उच्च न्यायालयासमोरील निवेदनासह माघारी घेण्यात आला आहे. राणेंना सत्र न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांचा कालावधी दिला होता. राणे हे स्थानिक न्यायालयात शरण गेले आहेत. त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांना लवकरच अटक होणार आहे.
नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. नितेश राणे वकिलांसमवेत न्यायालयात हजर झाले होते. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला होता.हा अर्ज काल सत्र न्यायालयाने फेटाळला होता. (Nitesh Rane News)
मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते. (Nitesh Rane bail hearing)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.