Narayan Rane - Vinayak Raut - Nitesh Rane
Narayan Rane - Vinayak Raut - Nitesh Rane sarkarnama
कोकण

Vinayak Raut : राणे हेच रिफायनरीचे दलाल ; राऊतांचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

रत्नागिरी : भाजपचे नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी आज रिफायनरी प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा ताफा अडवत विरोध केला. यावरुन कोकणातील राजकारण पेटलं आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी निलेश राणेंवर गंभीर आरोप केले आहेत.

बारसूमधील प्रस्तावित रिफायनली प्रकल्पाच्या जागेला आज निलेश राणे यांनी भेट दिली. त्यावर विनायक राऊत म्हणाले, "सरकार रिफायनरीच्या दलालांकडून विरोध करत असलेल्या ग्रामस्थांवर अत्याचार करत आहे. शिवसेना लवकरच याबाबत भूमिका घेणार आहे,"

"आत्ताचे राज्यकर्ते रिफायनरीचे दलाल आहेत. मग ते केंद्रातले असो किंवा राज्यातले ते रिफायनरीचे समर्थक आहेत. किंबहुना दलाल आहेत," असे राऊत म्हणाले

"रत्नागिरीतील बारसू आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या 5 गावांचा रिफायनरी प्रकल्पाला 100 टक्के विरोध आहे. परंतु रिफायनरीचे जे दलाल आहेत ते याठिकाणी जात आहेत. प्रामाणिकपणे विरोध करणाऱ्यांना धाक दाखवून दडपशाही करुन पोलिसांची दादागिरी सुरु आहे," असा आरोप राऊत यांनी केला आहे.

त्यांचे म्हणणे ऐकून घ्या

राऊत म्हणाले, "बारसूच्या आसपासच्या 6 गावांचा या प्रकल्पाला विरोध आहे. येथील 450 लोकांवर तडीपारीच्या नोटीसा लावण्यात आल्या आहेत. याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या घरादारावर अशाप्रकारे नांगर फिरवून हा प्रकल्प राबवता येणार नाही. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या,"

रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी निलेश राणे बारसू गावात गेले होते. आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं निलेश राणे यावेळी म्हणाले. प्रकल्पाच्या विरोधात नाणारवासीयांनी मोठे आंदोलन उभारले होते. तुम्ही सांगाल तेव्हा त्यावेळी तुमच्या अडचणी सोडवायला येऊ, असे सांगत राणेंनी कशीबशी आपली सुटका करुन घेतली. यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी निलेश राणेंचे ऐकूनही घेतले नाही.

नाणार प्रकल्पाच्या पाहणीसाठी गेलेले निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राणे म्हणाले, "बारसू या गावात प्रकल्पाच्या सर्व्हेचे काम सुरु झाले आहे. सॉईल सर्व्हे, एरियल सर्व्हे झाला आहे. ते यशस्वी होत आहे. विरोधाला विरोध करु नका. अधिकाऱ्यांना आणि ग्रामस्थांना विश्वासात घेण्यासाठी आम्ही याठिकाणी आलो आहोत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT