Nilesh Rane : रत्नागिरीत राडा : माफी मागून राणेंनी केली कशीबशी आपली सुटका

refinery project : संतापलेल्या ग्रामस्थांनी निलेश राणेंचे ऐकूनही घेतले नाही.
Nilesh Rane
Nilesh Rane sarkarnama
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीला (refinery project) स्थानिकांचा विरोध कायम आहे. आता राज्यात झालेल्या सत्तातरानंतर नाणार रिफायनरी प्रकल्पाचे काम रत्नागिरीतील बारसू याठिकाणी सुरु झाले आहे. भाजपचे नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी प्रस्तावित जागेला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा ताफा अडवत विरोध केला.

यावेळी महिलांनी ठिय्या देत याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. कुठल्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही. अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी निलेश राणे बारसू गावात गेले होते. आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं निलेश राणे यावेळी म्हणाले.

प्रकल्पाच्या विरोधात नाणारवासीयांनी मोठे आंदोलन उभारले होते. तुम्ही सांगाल तेव्हा त्यावेळी तुमच्या अडचणी सोडवायला येऊ, असे सांगत राणेंनी कशीबशी आपली सुटका करुन घेतली. यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी निलेश राणेंचे ऐकूनही घेतले नाही.

Nilesh Rane
Chitra Wagh : ज्येष्ठांना डावलून 'मर्सिडीज बॉय'ला मंत्रिपद दिलं ; ठाकरे पिता-पुत्राला टोला

नाणार प्रकल्पाच्या पाहणीसाठी गेलेले निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राणे म्हणाले, "बारसू या गावात प्रकल्पाच्या सर्व्हेचे काम सुरु झाले आहे. सॉईल सर्व्हे, एरियल सर्व्हे झाला आहे. ते यशस्वी होत आहे. विरोधाला विरोध करु नका. अधिकाऱ्यांना आणि ग्रामस्थांना विश्वासात घेण्यासाठी आम्ही याठिकाणी आलो आहोत,"

निलेश राणे म्हणाले,"केंद्र आणि राज्य सरकार हा प्रकल्प करत आहे. कोणाच्या काय अडचणी आहेत ते आम्ही जाणून घेऊ. कोणाच न ऐकायला हे काय ठाकरे सरकार नाही. सर्व्हेचे काम पाहायला आलोय. एमआयडीसीची जमीन असल्याने सर्व्हेसाठी परवानगीची गरज आहे,"

  • नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यानंतर बारसू येथे प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

  • या रिफायनरीसाठी जमिनीचे, मातीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

  • शनिवारी, रिफायनरीविरोधक आंदोलकांनी ड्रोन सर्व्हे, माती परीक्षणाला विरोध केला होता.

  • स्थानिकांचा विरोध पाहता सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले नाही.

  • त्यानंतर आज पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com