Anil Parab, Kirit Somaiya Latest News
Anil Parab, Kirit Somaiya Latest News  sarkarnama
कोकण

Kirit Somaiya| साई रिसॉर्ट पाडण्याचा मुहुर्त ठरला; किरीट सोमय्यांनी स्पष्टचं सांगितलं...

सरकारनामा ब्युरो

रत्नागिरी : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा ट्विट करत माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. दापोलीतील वादग्रस्त रिसॉर्टच्या सीआरझेडमधील बांधकामप्रकरणी सोमवार (१२ सप्टेंबर) २ याचिकेवर सुनावणी होणार आहे. येत्या आठ दिवसांत वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि ऑक्टोबर महिन्यात पाले जाईल, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. न्यायालयातील निकाल सकारात्मक आला तर फौजदारीची प्रक्रिया सुरू होईल. असही सोमय्यांनी म्हटले आहे.

यासंबंधी सोमय्यांनी एक ट्विट करत ही माहिती दिली आहे. ''अनिल परब साई रिसॉर्ट घोटाळा उद्या सोमवार १२ सप्टेंबर २ याचिकेवर सुनावणी, दापोली न्यायालयात भारत सरकारच्या "अनिल परबवर पर्यावरण कायद्या खाली फौजदारी खटला दाखल करावा आणि महाराष्ट्र सरकारच्या खेड न्यायालयात "बनावटी कागदपत्र दाखवून, फसवणुकीने बिन शेती करून घेतले म्हणून कारवाई" होणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

किरीट सोमय्या बुधवारी (ता. ७) रत्नागिरी दौऱ्या‍वर गेले होते. यावेळी त्यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांच्याही भेटीगाठी घेतल्या. अ‍ॅड. अनिल परब यांनी दापोलीत पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून साई रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्या संदर्भात रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी आणि परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले, 'माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दबावामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी रिसॉर्टवर कारवाई केली नाही. न्यायालयातही अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल याचिकेचाही जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आला नाही. पण आमच्या पाठपुराव्यानंतर रिसॉर्ट पाडण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात निविदा प्रक्रिया केली करुन रिसॉर्ट पाडण्यात येईल, असेही सोमय्यांनी स्पष्ट केले.

पर्यावरण नियमांचे उल्लंघन करुन रिसॉर्ट अनधिकृतपणे बांधण्यात आले होते. याप्रकरणी खेड व दापोली न्यायालयात अ‍ॅड. परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. १२ सप्टेंबरला यासंबंधी सुनावणी होणार आहे. दापोली न्यायालयात अनिल परबांविरोधात फसवणूक याचिका दाखल केली आहे. साई रिसॉर्टचे १५ हजार ८०० स्क्वेअर फुटाचे बांधकाम करताना रोख रक्कम वापरण्यात आल्याचा संशय आहे. तसेच या प्रॉपर्टीचा करही परब यांनी भरण्यात आळा आहे. याचीही आयकर विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT