Doctor conversion nikah case Sarkarnama
कोकण

Kalyan doctor conversion nikah case : धर्मांतर करून निकाहचा दबाव? डॉक्टरविरोधात गंभीर आरोप; कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा

Kalyan doctor booked over alleged conversion pressure, forced nikah and sexual assault : युवतीच्या तक्रारीनुसार 2020 पासून दबाव, इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध, कथित धर्मांतर आणि निकाहाचे आरोप; पोलिसांकडून तपास सुरू.

Pradeep Pendhare

Mumbai Metropolitan Region : प्रेमसंबंधातून एका युवतीवर धर्मांतर करून निकाह करण्यासाठी दबाव आणल्याचा तसेच तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध प्रस्थापित करून धमकावल्याचा गंभीर आरोप एका डॉक्टरविरोधात करण्यात आला आहे.

या प्रकरणी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडे (Police) दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पीडित युवती अल्पवयीन असताना 2020 पासून संबंधित डॉक्टरच्या दवाखान्यात कामासाठी जात होती. कामाच्या निमित्ताने दोघांची ओळख वाढल्यानंतर डॉक्टरने तिच्यावर कथितरीत्या दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. युवतीला रात्री उशिरापर्यंत काम करण्यास भाग पाडणे, अश्लील भाषेत बोलणे आणि लैंगिक संबंधांसाठी दबाव आणल्याचा आरोपही तिने केला आहे.

तक्रारीनुसार, 2021 मध्ये संबंधित डॉक्टर (Doctor) युवतीला कल्याण पश्चिमेकडील एका लॉजमध्ये घेऊन गेला. तेथे स्वतःचे ओळखपत्र दाखवून आपण तिचे पती असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप युवतीने तक्रारीत केला आहे. या घटनेनंतरही तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यात आला. 2024 मध्ये विवाह करण्यासाठी दबाव आणल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

युवतीच्या तक्रारीनुसार, 16 ऑगस्ट 2025 रोजी तिला वांद्रे येथील न्यायालयात नेण्यात आले आणि काही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारल्याचे तिला सांगण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, आपण कोणताही धर्म स्वीकारलेला नसल्याचे युवतीने पोलिसांना स्पष्ट केले आहे.

तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, 21 ऑगस्ट 2025 रोजी वांद्रे येथील एका कार्यालयात मौलवीच्या उपस्थितीत दोघांचा निकाह लावण्यात आला. या संपूर्ण प्रकाराची माहिती कुटुंबीयांना देऊ नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही आरोप युवतीने केला आहे.

या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला असून, तक्रारीतील आरोपांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. पोलिस तपासातून या प्रकरणातील घटनाक्रम आणि आरोपांबाबत अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT