108 Ambulance : परभणीत रुग्णवाहिकेसाठी 108 नंबरवर 7 फोन, 2 तासांचा कथित विलंब; गर्भवतीसह बाळही दगावलं; 5 जणांवर गुन्हा

Pregnant woman and unborn baby die amid alleged delay in 108 ambulance service in Parbhani : परभणी हादरले; नांदेडला हलविण्याचा डॉक्टरांचा सल्ला, मात्र रुग्णवाहिका वेळेत न आल्याचा पतीचा आरोप; तक्रारीवरून चालक, रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांसह पाच जणांविरोधात FIR
Parbhani 108 ambulance delay
Parbhani 108 ambulance delaySarkarnama
Published on
Updated on

Parbhani pregnant woman death : परभणीमध्ये सात महिन्यांच्या गर्भवतीला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतर पतीने 108 रुग्णवाहिकेसाठी तब्बल सात ते आठ वेळा फोन केला. मात्र, दोन तास उलटूनही रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या दरम्यान गर्भवती महिलेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून रुग्णवाहिका चालक, त्यावरील डॉक्टर आणि स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांसह पाच जणांविरोधात परभणीतील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणीतील (Parbhani) जिंतूरच्या साठेनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

येथील नेवाती मोहल्ल्यातील मरजीनाबी अमीन शेख सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मरजीनाबी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना 8 ऑगस्टला पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर त्यांचे पती शेख अमीन शेख अयुब यांनी 108 रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला.

तक्रारीनुसार, पतीने रुग्णवाहिकेसाठी सात ते आठ वेळा फोन केला. मात्र, बराच वेळ प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. तब्बल दोन तास उलटूनही रुग्णवाहिका न आल्याने उपचारासाठी (Hospital) वेळेत पुढील रुग्णालयात हलवता आले नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Parbhani 108 ambulance delay
Ramdas Athawale Delimitation Claim : शिर्डी खुला, अहिल्यानगर राखीव? रामदास आठवलेंच्या वक्तव्याने परिसीमनाच्या चर्चेला वेग

रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास झालेल्या विलंबामुळे मरजीनाबी शेख यांचा मृत्यू झाला, तसेच त्यांच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर परभणी जिल्हा स्त्री रुग्णालयातील 108 आपत्कालीन सेवेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गंभीर रुग्णाला उच्चस्तरीय उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवायचे असताना रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास नेमका किती वेळ लागला, याची चौकशी होण्याची मागणी होत आहे.

Parbhani 108 ambulance delay
Shirdi Fruit Vendor Murder : शिर्डीच्या साई मंदिरासमोर महिलेची निर्घृण हत्या; 'लोक बघत राहिले, कुणी पुढे का आले नाही?' विखे पाटलांचा संताप

मृतदेहाबाबतही पतीचा गंभीर आरोप

महिलेच्या मृत्यूनंतर आपल्याला माहिती न देता तिचा मृतदेह संबंधित ठिकाणाहून हलवून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आपली दिशाभूल करण्यात आली, असाही गंभीर आरोप पती शेख अमीन यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे रुग्णवाहिका चालक, रुग्णवाहिकेवरील डॉक्टर आणि स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांसह एकूण पाच जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

108 रुग्णवाहिका नेमकी कुठे होती?

गंभीर रुग्णाच्या बाबतीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. त्यामुळे या प्रकरणात 108 सेवेला पहिला कॉल नेमका किती वाजता करण्यात आला?, त्यानंतर किती कॉल झाले?, त्या वेळी उपलब्ध रुग्णवाहिका कुठे होत्या?, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास विलंब का झाला? आणि रुग्णालयाकडून रुग्णाला हलविण्याच्या प्रक्रियेत नेमकी काय कार्यवाही झाली?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासातून या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com