KDMC sarkarnama
कोकण

Dombivli Politics : राजकीय स्फोट! KDMC तील 'त्या' नॉट रिचेबल नगरसेवकांना 48 तासांचा अल्टिमेटम, सदस्यत्वावर टांगती तलवार

Kalyan Dombivli Municipal Corporation : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला होता. ऐन वेळी तीन नगरसेवक नॉट रिचेबल झाले होते.

Aslam Shanedivan

  1. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उबाठा गटाचे काही नॉट रिचेबल नगरसेवकांबाबत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.

  2. कोणत्याही गटात सामील न झाल्याने संबंधित नगरसेवकांना अंतिम इशारा देण्यात आला आहे.

  3. ४८ तासांत खुलासा न केल्यास त्यांचे सदस्यपद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Kalyan Dombivli Political News : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेवेळी मोठा राजकीय ड्रामा झाला होता. ऐन सत्ता स्थापनेवेळी ठाकरेंच्या शिवसेनेतील तीन नगरसेवक नॉट रिचेबल झाले होते. यामुळे ते फुटल्याची चर्चा सुरू झाली होती. यावरून शिवसेनेनं देखील गट स्थापनेसाठी या नगरसेवकांना यावं लागेल अन्यथा यांच्यावर कारवाई केली जाईल असा गंभीर इशारा दिला होता. दरम्यान आता नॉट रिचेबल झालेल्या नगरसेवकांचे सदस्य पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे समोर आले आहे. तर याबाबत कोकण विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत. तर याबाबत ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुखांनी दिली आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून पक्षाध्यक्ष न पाळणाऱ्या त्या तीन सदस्यांवर अपात्रेतेची टांगती तलवार लटकत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे ११ नगरसेवक निवडून आले. निकाल लागताच यातील चार नगर सेवक नॉट रिचेबल झाले होते. पण महापौर पदाच्या निवडणूकीत किर्ती ढोणे हजर झाल्या. मात्र नगरसेवक राहूल कोट, मधूर म्हात्रे आणि स्वप्नीनी केणे हे गैरहजर राहिले. तसेच ते अद्यापही नॉट रिचेबल असल्याचेच बोलले जात आहे.

दरम्यान आता या नॉट रिचेबल नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर येत असून ते कोणत्याही गटात सामील झालेले नाहीत. यावरून शिवसेनेनं त्यांना अंतिम इशारा दिला आहे. तसेच गटात सामील न झाल्यास गरसेवकांचे सदस्य पद रद्द करू असा इशारा दिला होता. त्याप्रमाणे त्या नगरसेवकांचे सदस्य पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

११ नगरसेवकांच्या सदस्य नोंदणी असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेतील हे तीन नगरसेवक कोणत्याही गटात सहभागी नाहीत. तर ते कोणत्या गटात आहेत हे कोकण विभागीय आयुक्तांनी स्पष्ट करावे असे आदेश देण्यात आले होते. यावर आयुक्तांनी उत्तर देताना ते कोणत्याही गटात सहभागी नाहीत, असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच ते ठाकरेंच्या शिवसेनेत गणले जातील हे देखील स्पष्ट केलेले नाही. यामुळे त्यांच्यावर अपात्रेतीची कारवाई केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी नगरसेवकांना अंतिम नोटिस बजावली आहे. या नोटिसध्ये त्यांनी, गट स्थापनेच्या प्रक्रियेत या नगरसेवकांनी सहकार्य केले नाही. ही कृती पक्षाच्या विरोधातील असून या तीन सदस्यांनी स्वेच्छेने पक्षाचा त्याग केला आहे, असे मानले जाईल असा इशारा दिला आहे.

तसेच पक्षाने या बाबत वारंवार विचारणा केली असून खुलासाही मागितला आहे. मात्र अद्याप याबाबतचा खुलासा या तीन नगरसेवकांनी केलेला नाही. आता ही अंतिम नोटिस असून ४८ तासात खुलासा करावा. अन्यथा या नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांकडून अपात्रेतीची कारवाई केली जाईल, असे म्हटलं आहे.

FAQs :

1. KDMC मध्ये नॉट रिचेबल नगरसेवकांबाबत काय घडले?
काही नगरसेवक कोणत्याही गटात सामील झाले नाहीत आणि ते संपर्कात नसल्याने त्यांना अंतिम इशारा देण्यात आला आहे.

2. नगरसेवकांना किती वेळ देण्यात आला आहे?
त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी ४८ तासांचा कालावधी देण्यात आला आहे.

3. स्पष्टीकरण न दिल्यास काय कारवाई होऊ शकते?
त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.

4. या कारवाईसाठी कोण आदेश देणार आहे?
कोकण विभागीय आयुक्तांकडून सदस्यपद रद्द करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते.

5. ही घटना कोणत्या महानगरपालिकेत घडली आहे?
ही घटना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत घडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT