KDMC News : महापालिकेचा अजब कारभार, बलात्काराच्या आरोपाखाली कर्मचारी कोठडीत; पगार मात्र सुरूच!

KDMC Employee Swapnil Joshi Arrested : स्वप्नील जोशी हा महापालिकेचा कर्मचारी आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, तो ४० दिवस जेलमध्ये असतानाही त्याचा पगार रोखण्यात आलेला नव्हता.
KDMC
KDMCsarkarnama
Published on
Updated on

KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कारभारातील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. अत्याचाराच्या (बलात्कार) गंभीर आरोपाखाली तब्बल 40 दिवस न्यायालयीन कोठडीत असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याला त्या काळातही नियमित पगार देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

विशेष म्हणजे अटक आरोपी हा पालिका कर्मचारी असल्याची बाब पोलिसांनाही नंतर समजली. या प्रकरणामुळे महापालिका प्रशासनासह पोलिसांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मानपाडा पोलिस ठाण्यात ३ मे २०२५ रोजी स्वप्नील जोशी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी बीएनएस ६४(२), ६९, ११५(२) आणि ३५२ या कलमान्वये कारवाई करत त्याला अटक केली होती. अटकेनंतर तो तब्बल ४० दिवस न्यायालयीन कोठडीत होता. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली.

मात्र, या संपूर्ण कालावधीत तो कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांच्या निदर्शनास आली नव्हती. तब्बल सहा महिन्यांनंतर, २७ डिसेंबर २०२५ रोजी मानपाडा पोलिसांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून स्वप्नील जोशी हा त्यांचा कर्मचारी असून त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली. यानंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली.

स्वप्नील जोशी हा महापालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, तो ४० दिवस जेलमध्ये असतानाही त्याचा पगार रोखण्यात आलेला नव्हता. शासकीय नियमांनुसार कोणताही कर्मचारी ४८ तासांपेक्षा अधिक काळ कोठडीत किंवा जेलमध्ये असल्यास त्याचे निलंबन अपेक्षित असते.

जोशी दीर्घकाळ अनुपस्थित असतानाही त्याची हजेरी कशी नोंदवली गेली आणि त्याला पगार कसा देण्यात आला, याबाबत मोठा प्रशासकीय घोळ समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. जोशीने आपली माहिती जाणीवपूर्वक लपवली की प्रशासनातील कोणाचा त्याला पाठिंबा होता, याचा शोध घेतला जात आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे याविषयी म्हणाल्या, 29 जानेवारीला पोलीस विभागाच पत्र प्रभाग कार्यालयाला प्राप्त झालं आहे. 30 जानेवारीला सामान्य प्रशासन विभागाला ते प्राप्त झालं. त्या पत्रामध्ये सदर कर्मचारी अटक झाला का किती तास कोठडीमध्ये होता. याविषयी काहीही माहिती नसल्यामुळे बुधवारी आम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधून याविषयी माहिती मागवली. त्यांनी आम्हाला माहिती अपडेट करून दिली आहे. कारण कोणताही कर्मचारी अधिकारी जर तो अटकेत असेल तर ठराविक तासाच्या कालावधीत त्याला निलंबित करावं लागतं.

पोलिसांकडून माहिती उशीरा मिळाली

पोलीस विभागाकडून ही माहिती उशिरा प्राप्त झाल्यामुळे या कारवाईला विलंब झाला आहे. त्या कर्मचाऱ्यांचा पगार हा निघालेला असू शकतो. कारण कर्मचारी रजेवर होता किंवा काय कारण होतं त्यामुळे त्याचा पगार निघालेला असू शकतो तो किती दिवसांचा निघालेला हे माहिती नाही. संबंधित प्रभाग कार्यालयाचा अहवाल हा मागवलेला आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याविषयी माहिती मिळेल असे गुळवे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com