Shivsena Kalyan Leader Ramesh Tikhe Death sarkarnama
कोकण

Shivsena UBT : बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर्स लावणाऱ्या ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू, शिवसेनेचा गंभीर आरोप, पोलिसांकडूनही स्पष्टीकरण

Shivsena Kalyan Leader Ramesh Tikhe Death : कल्याण पूर्व येथील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. तर हा मृत्यू पोलिसांच्या दबावामुळे झाल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.

शर्मिला वाळुंज

  1. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान ठाकरे गटातील दोन नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

  2. शिवसेनेने बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर कुटुंबीयांनी बदनामीचा आरोप करत गंभीर भूमिका घेतली आहे.

  3. याच प्रकरणात शिवसेनेतील एका पदाधिकाऱ्याच्या मृत्यूमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत.

Kalyan Dombivli : शर्मिला वाळुंज

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. यानंतर ते बेपत्ता झाल्याची तक्रार शिवसेनेनं कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दिली असून पदाधिकाऱ्यांनी नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर देखील शहरात चिटकवले. ज्यानंतर मधुर म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार देत आपल्या मुलाची बदनामी केली जात असून ते कोठेही गेले नसल्याचे म्हटले होते. ज्यामुळे कल्याण डोंबिवलीचे राजकीय वातावरण तापले असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेतील एका पदाधिकाऱ्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. तर हा मृत्यू पोलिसांच्या दबावामुळे झाल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे निवडून आले आहेत. पण सत्ता समि‍करणांच्या गणितावेळीच हे दोन्ही नगरसेवक बेपत्ता झाले आहेत. यामुळे शिवसेनेकडून कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याचा पोलिस तपास करत आहेत.

पण याचवेळी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर शहरभर चिटकवले. बेपत्ता नगरसेवक कुठे आढळल्यास ठाकरे गटाच्या शाखेला संपर्क साधावा, अशा आशयाचा मजकूर त्या पोस्टरवर लिहिण्यात आला होता. ज्यानंतर येथे खळबळ उडाली होती.

तर या प्रकारानंतर म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत याप्रकरणी तक्रार दिली होती. यातक्रारीनंतर पोलिसांनी चौकशीसाठी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव आणला होता असाही दावा आता ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान हे पोस्टर लावणारे पदाधिकारी रमेश तिखे यांची तब्येत बिघड आणि त्यांचा आज पहाटे हृदयविकाराने मृत्यू झाला.

त्यांच्या या मृत्यूनंतर आता खळबळ उडाली असून कोळसेवाडी पोलिसांकडून वारंवार येत असलेल्या फोनमुळेच त्यांची तब्येत खालवली. त्यामुळेच ते अस्वस्थ होते आणि या दडपणामुळेच त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे कल्याण पूर्वमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले जात आहेत. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात असून पोलिसांच्या कारवाईविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पण हे सर्व आरोप पोलिसांनी फेटाळून लावले असून या प्रकरणाची चौकशी कायद्याच्या चौकटीत सुरू आहे.

तर पदाधिकारी रमेश तिखे यांच्या मृत्यूचे नेमकी कारणे शोधली जातील. पण अद्याप शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नसून तो आल्यानंतरच अधिकृत माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

FAQs :

1) कल्याण-डोंबिवलीतील बेपत्ता नगरसेवक कोण आहेत?
👉 मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे ठाकरे गटाचे नगरसेवक असल्याची माहिती आहे.

2) शिवसेनेने काय तक्रार दाखल केली आहे?
👉 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची तक्रार कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

3) कुटुंबीयांचा आरोप काय आहे?
👉 मधुर म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी मुलाची बदनामी होत असल्याचा आरोप केला आहे.

4) पदाधिकाऱ्याच्या मृत्यूबाबत शिवसेनेचा दावा काय आहे?
👉 पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

5) या प्रकरणाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
👉 या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT