Kalyan News : कल्याण पश्चिमेतील उंबर्डे डम्पिंग ग्राउंडवर भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना घडली असून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी यांनी डम्पिंग ग्राउंडवरील सुपरवायझर हात सोडत सुपरवायझर किरण रसाळ यांना शिवीगाळ करत मारहाण केलीय. या घटनेनंतर संतप्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. यामुळे कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, कल्याण-डोंबिवलीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
उंबर्डे डम्पिंग ग्राउंडवरील कामकाजाची पाहणी करण्यासाठी आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि महापालिकेचे उपायुक्त उपस्थित होते. या पाहणीदरम्यान डम्पिंग ग्राउंडवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रे नसल्याचे निदर्शनास आले. या मुद्द्यावरून आमदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी सुपरवायझर किरण रसाळ यांच्याशी देखील वाद झाला.
या वादादरम्यान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी यांनी रसाळ यांना शिवीगाळ करत मारहाण केली. रसाळ हे दारूच्या नशेत असल्याचा आरोपही भाजप पदाधिकाऱ्यांसह जोशी यांनी केला आहे. तसेच याबाबत जाब विचारत कानशिलात लगावली. तसेच व्यवसथित बोलायचं असे म्हणत बजावलं. तसेच तेथून रसाळ जात असताना येथेच थांबायचं, याच्याकडे ओळखपत्रे नाही असे म्हणत धमकावल्याचे समोर येत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल होत असून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. डम्पिंग ग्राउंडमध्ये प्रवेशासाठी आणि कचरा उतरवण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले. या आंदोलनाचा परिणाम कल्याण-डोंबिवली शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
आमदार सुलभा गायकवाड आणि महापालिकेचे उपायुक्त उपस्थित असताना हा प्रकार घडल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. डम्पिंग ग्राउंडवरील कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे, कामकाजावरील देखरेख आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणी महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, संबंधित आरोपांची चौकशी केली जाते का? यासाह भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.