BJP leader Attack Case : भाजप नगरसेवकावर भरदिवसा तलवारीने जीवघेणा हल्ला; शहरात प्रचंड खळबळ, 3 जणांविरोधात गुन्हा दाखल!

BJP leader Akash Dalvi attack case latest update : भाजप नगरसेवकावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी 3 आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला
crime news
crime newsSarkarnama
Published on
Updated on

बुलढाणा शहरात भाजप नगरसेवकावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाणा नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक आकाश दळवी यांच्यावर कारंजा चौक परिसरात हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आकाश दळवी यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, आकाश दळवी यांना काही व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शस्त्र दाखवून धमकावण्यात आले आणि तलवारीच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे कारंजा चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

crime news
Beed Crime News : बोगस कामाच्या बिलावर सही नाकारली; बीडमध्ये इंजिनिअरने ग्रामरोजगार सेवकाला थेट घरात घुसून चोपले

या प्रकरणाची गंभीर दखल घेत बुलढाणा शहर पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निखिल शर्मा, वंश शर्मा आणि आर्यन शर्मा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी संबंधित प्रकरणात विविध कलमांनुसार कारवाई सुरू केली असून, हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास केला जात आहे.

दरम्यान, या घटनेला राजकीय वादाची पार्श्वभूमी आहे का, याचीही चर्चा बुलढाणा शहरात सुरू झाली आहे. आकाश दळवी आणि संबंधित व्यक्तींमध्ये यापूर्वी कोणता वाद झाला होता का, राजकीय मतभेदातून हा प्रकार घडला का, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, हल्ल्यामागे राजकीय कारण असल्याचे अद्याप पोलिसांकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

crime news
ब्रिटिश संसदेत 'लाडकी बहीण'चा डंका! हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंना पुरस्कार, पाहा PHOTOS

कारंजा चौक हा शहरातील वर्दळीचा भाग असल्याने तेथे तलवारीसारख्या शस्त्राचा वापर करण्याचा कथित प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून घटनाक्रम, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com