Nagar Panchayat election; Sandesh Parkar, Nitesh Rane And Ravindra Chavan sarkarnama
कोकण

राणेंना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! विजयानंतर पारकरांची भावनिक प्रतिक्रिया, कट्टर विरोधक भाजप प्रदेशाध्यक्षांचे नावही घेतले

Sandesh Parkar On Nitesh Rane And Ravindra Chavan : कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यासह प्रदेशाध्यांची आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण भाजप मोठी प्रचार यंत्रणा आणि रसद असूनही येथे आघाडीचा विजय झाला.

Aslam Shanedivan

  1. कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत संदेश पारकर यांनी भाजपच्या मजबूत प्रचार यंत्रणेला छेद देत विजय मिळवला.

  2. या निकालामुळे पालकमंत्री नीतेश राणेंना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे.

  3. विजयानंतर संदेश पारकर यांनी 2018 मधील 36 मतांच्या पराभवाची आठवण सांगत भावनिक प्रतिक्रिया दिली.

Sindhudurg News : कणकवली नगरपंचायतीसाठी भाजपकडून मोठी प्रचार यंत्रणा राबविण्यात आली होती. कार्यकर्त्यांचे भक्‍कम नेटवर्क प्रत्‍येक प्रभागात काम करत होते. भाजपकडून आलेली रसद प्रत्‍येक मतदारापर्यंत काटेकोरपणे पोचवण्यात येत होती. मात्र या तुलनेत संदेश पारकर यांच्या आघाडीकडे अल्‍प कार्यकर्त्यांचे पाठबळ होते. तरीही पारकर यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांना कणकवलीच्या बालेकिल्ल्याला पुन्हा एकदा मोठा धक्‍का देत कणकवली काबिज केली. या विजयामुळे पारकर यांचे नाव राज्‍यस्तरापर्यंत पोहोचले आहे. अशात या विजयाचा मोठा वाटा कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांचा राहिल असे सांगताना त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेही नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी, रवींद्र चव्हाणांचा 2018 किस्सा सांगताना, माझा 36 मतांनी पराभव पाहून त्यावेळी तत्कालीन भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याही डोळ्यात अश्रू होते. पण आज नगराध्यक्ष निवडणुकीतील मिळालेल्या विजयामुळे त्या अश्रूंची झाली फुले झाल्याचे सांगितले आहे.

येथील नगरपंचायतीची पहिली निवडणूक 2003 मध्ये झाली होती. त्‍यावेळी पारकर राष्‍ट्रवादी पक्षात होते, तर वैभव नाईक हे काँग्रेस पक्षात होते; मात्र त्‍यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा नारायण राणे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्‍ला होता. त्‍यामुळे कणकवली नगरपंचायतीची पहिली निवडणूक शिवसेना सहज जिंकेल, असे चित्र होते. परंतु, पारकर यांनी वैभव नाईक यांना सोबत घेऊन राणेंच्या शिवसेनेचा मोठा मुकाबला केला. त्‍यावेळी झालेल्‍या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत पारकर यांनी मोठा विजय संपादन केला. त्यानंतर त्यांचा 2018 विजय निश्‍चित मानला जात असतानाच पराभवाचा धक्का बसला होता. त्यांचा 6 मतांनी पराभव झाला होता.

त्यावेळची आठवण सांगताना पारकर म्हणाले, त्यावेळी माझा झालेला पराभव पाहून त्यावेळीचे तत्कालीन भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याही डोळ्यात अश्रू आले होते. त्यांना वाईट वाटले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, संदेश वाईट वाटून घेऊ नकोस अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आठव तू पुढच्या वेळी निवडणूक लढायला पाहिजेस. या रवींद्र चव्हाण यांच्या आधारापासून मी प्रेरणा घेतली आणि आज मी निवडून आलो तत्कालीन कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अश्रूंची आज मी फुले केल्याचेही पारकर यांनी सांगितले.

दरम्यान आता या विजयामुळे संदेश पारकर हे नाव राज्‍यस्तरापर्यंत पोहोचले होते. त्‍यानंतर आता पुन्हा एकदा पालकमंत्री नीतेश राणे यांच्या बालेकिल्‍ल्‍यात त्यांनी धक्‍का देत कणकवली नगरपंचायत काबिज केली आहे. यापूर्वी देवगड नगरपंचायतीच्या निवडणुकीतही पारकर यांनी आपली ताकद दाखवून तेथील सत्ता मिळवून दाखविली होती. मात्र अलीकडच्या काळात देवगडमधील नगराध्यक्ष आणि इतर काही नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला.

काँग्रेस, राष्‍ट्रवादी, भाजप आणि आता ठाकरे शिवसेना असा संदेश पारकर यांचा आजवरचा राजकीय प्रवास राहिला आहे; मात्र कणकवलीकरांमध्ये त्‍यांच्याबाबत असलेली आपुलकीची भावना अजूनही कायम राहिली आहे. २०१८ मध्ये झालेल्‍या कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीतही पारकर यांचा विजय निश्‍चित मानला जात होता.

पण त्‍यावेळी शहर विकास आघाडी हा तिसरा पर्याय मतदारांसमोर होता. यात पारकर यांची मते शहर आघाडीत विभागली गेली. त्‍यामुळे पारकर यांना अवघ्या ३७ मतांनी पराभव पत्‍करावा लागला होता. यंदा मात्र त्‍यांनी थेट दुरंगी लढतींना प्राधान्य दिले. त्‍यामुळे एकास एक लढत होऊन पारकर यांनी पुन्हा एकदा कणकवलीचे नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावला आहे. या विजयात कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांचा मोठा वाटा राहिला आहे.

पारकरांची राज्‍याच्या राजकारणात चर्चा

मागील वर्षी राज्‍य विधानसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे नीतेश राणे आणि ठाकरे शिवसेनेकडून संदेश पारकर यांनी निवडणूक लढवली. यात पारकर मोठ्या मताधिक्‍याने पराभूत झाले; मात्र कणकवली नगरपंचायतीच्या अनेक प्रभागांमध्ये त्‍यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. हीच ताकद त्यांनी कणकवली नगरपंचायत निवडणुकीतही दाखवून दिली. नगराध्यक्ष निवडणुकीतील विजयामुळे संदेश पारकर हे पुन्हा एकदा राज्‍याच्या राजकारणात चर्चेला आले आहेत.

FAQs :

1. कणकवली नगरपंचायतीत कोण विजयी झाले?
संदेश पारकर यांच्या आघाडीने कणकवली नगरपंचायत काबीज केली.

2. भाजपचा पराभव धक्कादायक का मानला जातो?
भाजपकडे मजबूत प्रचार यंत्रणा आणि कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क असूनही पराभव झाला.

3. या निकालामुळे कोणाला राजकीय धक्का बसला?
पालकमंत्री नीतेश राणे यांना कणकवलीत मोठा धक्का बसला आहे.

4. संदेश पारकर भावुक का झाले?
2018 मध्ये 36 मतांनी पराभव झाल्याची आठवण सांगत त्यांनी हा विजय संघर्षाचे फळ असल्याचे म्हटले.

5. या विजयाचे राजकीय महत्त्व काय आहे?
हा विजय संदेश पारकर यांचे नाव राज्यस्तरावर पोहोचवणारा ठरला असून स्थानिक राजकारणात मोठा बदल दर्शवतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT