Nitesh Rane : हॉस्पिटल तोडफोड आणि युवतीच्या मृत्यू प्रकरणी मोठी कारवाई, डॉक्टरांसह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल; नितेश राणेंची मध्यस्थीही व्यर्थ?

nursing student death Case : कणकवलीत नर्सिंग विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप करत संतप्त जमावाने खासगी रुग्णालयात घुसून तोडफोड केली होती.
Kankavli Hospital vandalism case; Nitesh Rane
Kankavli Hospital vandalism case; Nitesh Ranesarkarnama
Published on
Updated on
Summary
  • कणकवली तालुक्यातील कासार्डे-तर्फेवाडी येथील नर्सिंग विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त जमावाने खासगी रुग्णालयाची तोडफोड केली.

  • या प्रकरणात हॉस्पिटल तोडफोडीप्रकरणी डॉक्टरांच्या तक्रारीवरून 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

  • मृत तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार डॉक्टर अनंत नागवेकर आणि त्यांचा मुलगा मयूर नागवेकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

Kankavli News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्‍यातील कासार्डे-तर्फेवाडी येथील नर्सिंग विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर येथे जोरदार राडा झाला होता. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्या युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईक व ग्रामस्थांनी आक्रमक होत खासगी रुग्णालयाची तोडफोड केली होती. या प्रकरणात आता हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी डॉक्टरांसह मृत तरूणीचे नातेवाईक अशा 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेली मध्यस्थी व्यर्थ गेलेही समोर आले आहे.

कासार्डे येथील कस्तुरी चंद्रकांत पाताडे (वय 19) ही डेरवण येथील नर्सिंग महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होती. गेल्‍या काही दिवसांपासून तिच्या डोक्याच्या मागील बाजूला गाठ आली होती. त्यावरच उपचार करण्यासाठी नातेवाइकांसह कस्तुरी शुक्रवारी (ता.12) शहरातील खासगी रुग्‍णालयात दाखल झाली होती. यावर डॉक्टरांनी किरकोळ ऑपरेशन केल्यानंतर ती घरी जाऊ शकते असे सांगितले होते. ज्यानंतर तिच्यावर ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र ऑपरेशननंतर तिची प्रकृती बिघडली आणि रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. यामुळे तिला पुढच्या उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तेथे उपचारादरम्यान रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.

ज्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रूग्णालयाची तोडफोड केली. तसेच ग्रमस्थानी यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्या युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतदेह थेट रुग्णालयाच्या दारात ठेवत संताप व्यक्त केला. यावेळी येथे तणाव वाढल्याने तगडा पोलीस बंदोबस्तासह दंगलनियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

Kankavli Hospital vandalism case; Nitesh Rane
Nitesh Rane : कणकवलीत डॉक्टराचा हलगर्जीपणा? युवतीच्या मृत्यूनंतर संतापाचा उद्रेक, दंगलनियंत्रक पथक तैनात; नितेश राणेंचा थेट हस्तक्षेप

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी घटनेची माहिती घेत मृत युवतीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता. ज्यानंतर येथील तणाव निवळला होता. तर नातेवाईक व ग्रामस्थांनी केलेल्या तोडफोडीबाबत पोलिसांत तक्रार दाखल न करण्याचा निर्णय रूग्णालयाने घेतला होता.

मात्र यादरम्यान आता तोडफोड करणाऱ्या मृत युवतीच्या नातेवाईकांसह 50 ते 60 जणांविरोधात कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ज्या डॉ. अनंत नागवेकर यांनी कस्तुरीच्या मृत्यूबाबत आम्हीही शोकमग्न आहोत अशी प्रतिक्रिया दिली होती, पोलिसांत तक्रार दाखल करणार नाही असे म्हटले होते.

त्यांनीच ही फिर्याद दिल्याची माहिती मिळत आहे. तर मृत युवतीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. नागवेकर यांच्याविरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. यामुळे आता राणेंची मध्यस्थी व्यर्थ गेली असून तोडफोडप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्याची येथे दिसून येत आहे.

दरम्यान मृत कस्तुरी पाताडेचे रविवारी रात्री उशिरा शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली असून तिच्या शरीराचे काही नमुने कोल्हापूर व रत्नागिरी येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल 15 ते 20 दिवसात प्राप्त होणार आहे. यानंतरच कस्तुरीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल अशी माहिती कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी दिली आहे. शिवविच्छेदन प्रक्रिया करताना पाच डॉक्टरांचा समावेश होता असेही डॉ.‌ रेड्डी यांनी सांगितले आहे.

Kankavli Hospital vandalism case; Nitesh Rane
Nitesh Rane : मालवणमध्ये ट्वीस्ट? नीलेश राणेंनी धडाकेबाज स्टिंग ऑपरेशन केलं; त्याच भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी भाऊ नितेश राणेंनी भेट दिली, क्लिनचिटचा प्रयत्न?

FAQs :

1. नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू कुठे झाला?
➡️ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

2. हॉस्पिटल तोडफोड का करण्यात आली?
➡️ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईक व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

3. या प्रकरणात किती गुन्हे दाखल झाले आहेत?
➡️ परस्परविरोधी तक्रारीनुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

4. डॉक्टरांवर कोणते आरोप आहेत?
➡️ वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप डॉक्टर अनंत नागवेकर व त्यांचा मुलगा मयूर नागवेकर यांच्यावर आहे.

5. प्रशासनाची भूमिका काय होती?
➡️ पालकमंत्री नितेश राणे यांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नंतर कायदेशीर कारवाई झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com