Karjat Projects; Mahendra Thorve And Sudhakar Ghare sarkarnama
कोकण

Land Dispute : कर्जतच्या प्रकल्पांवरून शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली : थोरवेंकडून राष्ट्रवादीचे दलाल असा उल्लेख; सुधाकर घारेंचा पलटवार

Sudhakar Ghare response to Mahendra Thorve Over Karjat Projects : पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खटके उडताना दिसत असून कर्जतच्या प्रकल्पांवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Aslam Shanedivan

Raigad Political Controversy News : गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यात वाद होताना दिसत आहे. नुकताच थोरवे यांनी तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादी खालापूरमधील कंपन्यांना त्रास देत असून तटकरे कंपन्यांना ब्लॅकमेल करतायेत असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. या आरोपामुळे रायगडचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून कर्जतच्या प्रकल्पांवरून वादाची ठिणगी पडली आहे.

थोरवे यांनी घारेंच्या रोजगार आंदोलनावरून राष्ट्रवादी आणि तटकरेंना काहीच दिवसांच्या आधी लक्ष केलं होतं. तटकरे कंपन्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा खळबळजनक आरोप थोरवे यांनी केला होता. तर आंदोलनकर्त्यांनी स्वतःची झोळी भरण्यसाठी केलेली ती स्टंटबाजी होती, असा हल्लाबोल घारेंच्या रोजगार आंदोलनावर केला होता. ज्या कंपन्या स्थानिकांना रोजगार देण्याचे काम करतात. त्या बंद पाडण्याचा कोण विचार करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देऊ असा थेट इशाराही थोरवे यांनी सुधाकर घारे यांचे नाव न घेता दिला होता.

या गोष्टीला अद्याप पंधरा दिवसही होत नाही तोच थोरवे यांनी कर्जत तालुक्यातील विविध प्रकल्पांवरून तोफ डागली आहे. त्यांनी, येथील पोशीर धरण, शिलार धरण आणि टोरंट प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. प्रकल्पांसाठी जागा जात असल्यास ती विकू नका, तसेच स्थानिकांना योग्य मोबदला मिळेपर्यंत कोणत्याही धरण प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाही, असे थोरवे यांनी म्हटलं आहे.

यावेळी थोरवे यांनी राष्ट्रवादीचे काही जण मध्यस्थी करत असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे दलाल फिरत असल्याचा आरोप केला आहे. तसेच कोंढाणा धरण प्रकल्पात जे घडलं, त्याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून तो निवडणुकीत वापरल्याचा आरोपही थोरवेंनी केला.

ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. थोरवे चुकीच्या माध्यमातून खोटं बोलत आहेत. ते आणि त्यांचे नातेवाईकच तालुक्यात फिरत असल्याचा दावा करत उलट नागरिकांनी त्यांच्यापासून सावध राहावं, असे आवाहन घारे यांनी तालुक्यातील लोकांना केले आहे. दरम्यान कर्जत तालुक्यातील विविध प्रकल्पांवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत असून पुन्हा एकदा रायगडचे राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT