Kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात (KDMC) मुख्यालयात शुक्रवारी मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी महत्त्वाच्या नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तब्बल दोन तास प्रतीक्षा करूनही भेट न मिळाल्याने त्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
माहितीनुसार, आयुक्त त्या वेळी महापौर (Mayor) दालनात बैठकीत व्यस्त होते. याच दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्त जाधव मुख्यालयात दाखल झाला. विशेष म्हणजे, त्याला थेट महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत प्रवेश देण्यात आल्याचे पाहताच कांचन कुलकर्णी संतापल्या. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना वेळ नाही, पण कलाकारांना थेट प्रवेश दिला जातो, हे नेमकं कोणत्या नियमाने? असा थेट सवाल करत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
काँग्रेसच्या (Congress) कांचन कुलकर्णी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महापौर कार्यालयाबाहेर जवळपास 20 मिनिटे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वाढत असल्याचे पाहून महापौर स्वतः दालनाबाहेर आल्या आणि त्यांनी कांचन कुलकर्णी यांची समजूत काढली. त्यानंतर महापौरांनी चर्चेसाठी कुलकर्णी यांना दालनात बोलावले. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर अखेर वातावरण शांत झाले आणि वादावर पडदा पडला.
दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी कोणताही वाद वाढू न देता भूमिका स्पष्ट केली. मी एका नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने भेटायला आलो होतो. इथे कोणालाही आडकाठी केली जात नाही. उलट सर्वांनी नाटकाला यावं, यासाठीच भेट घेतली होती, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य टाळले.
या घटनेनंतर KDMC प्रशासनाच्या कामकाज पद्धतीवर आणि लोकप्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शहरातील राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.