Khed Municipal Elections; Ajit Pawar, Eknath Shinde, Uday Samant And Yogesh Kadam sarkarnama
कोकण

Municipal Elections : सामंत, कदमांनी भाजपला जवळ केलं... राष्ट्रवादीला लांब ठेवून शिवसेनेनं दाखल केला नगराध्यक्षपदाचा अर्ज

Uday Samant, Yogesh Kadam Vs NCP : जिल्ह्यात नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून खेडमध्ये केवळ शिंदेंची शिवसेना अन् भाजपचीच युती झाल्याची सध्याची स्थिती आहे.

Aslam Shanedivan

  1. पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे महायुती म्हणून खेड पालिकेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

  2. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी अजित पवार गट व रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे पदाधिकारी अनुपस्थित होते.

  3. त्यामुळे ही युती खरोखर महायुती आहे का फक्त शिवसेनेची युती, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Ratnagiri News : नगरपरिषद निवडणुकीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांची महायुतीची घोषणा आता फोल ठरल्याचे चित्र आहे. खेड नगरपरिषदेसाठी भाजप आणि शिवसेनेने एकत्र येत शिवसेनेच्या माधवी राजेश बुटाला यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. या युतीतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते अनुपस्थित होते. त्यामुळे युतीची चर्चा हवेतच विरल्याचे दिसून येते.

राज्यातील सत्तारुढ भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महायुतीमध्ये लढण्यासाठी आग्रही आहेत. पण स्थानिक पातळीवर हे गणित जमून येताना दिसत नाही. खेडमध्येही वेगळेच चित्र पहायला मिळाले.

चिपळूण येथील जाहीर सभेत पालकमंत्री उदय सामंत यांनी खेडमध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवत असल्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात शिवसेना आणि भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवून माधवी बुटाला याचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे महायुतीतच खदखद असल्याची चर्चा रंगली आहे.

खेड पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होऊन 2 दिवस होऊन देखील एकही अर्ज दाखल झालेला नव्हता.पण तिसऱ्या दिवशी (ता.12) युतीच्यावतीने माधवी बुटाला यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला.

मात्र या कार्यक्रमाला युतीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पार्टी आठवले गटाला माहिती देण्यात आली नाही. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनीच माहिती दिल्याने महायुतीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

खेडकरांचीही नाराजी :

नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैभव खेडेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते. पत्नी वैभवी खेडेकर यांचे नगराध्यक्ष अशा आशयाचे व्हॉट्सअॅप स्टेटसही ठेवण्यात आले होते.

याची शहरात जोरदार चर्चा रंगली होती. पण आता महायुतीच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेने उमेदवार दिला असून त्यांचा अर्ज देखील भरण्यात आला आहे. यामुळे भाजपकडूनच खेडेकर यांच्या रणनीतीला ब्रेक लावल्याची चर्चा आहे. हा अर्ज दाखल करताना ते अनुपस्थितिही होते.

FAQs :

1. खेड पालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून लढवण्याची घोषणा कोणी केली?
ही घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे केली.

2. उमेदवारी अर्ज दाखलतेवेळी कोणते पक्ष अनुपस्थित होते?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) यांचे नेते अनुपस्थित होते.

3. या घटनेमुळे कोणता वाद निर्माण झाला आहे?
महायुती खरोखर अस्तित्वात आहे का फक्त नावापुरती आहे, यावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

4. कोणत्या पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केला?
शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

5. जिल्ह्यातील महायुतीवर याचा काय परिणाम होऊ शकतो?
ही फूट जिल्ह्यातील महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते आणि आगामी निवडणुकीवर प्रभाव टाकू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT