Municipal Elections : राष्ट्रवादी शिवसेनेला सुरूंग लावण्याच्या तयारीत? माजी सभापतींसह त्यांचा मुलगा पोहचला तटकरेंच्या भेटीला

Sunil Tatkare Karjat Municipal Elections Politics : आगामी स्थानिकच्या आधी रायगडमध्ये पक्षबदलांचा पूर आला असून पक्षप्रवेशामुळे महायुतीलाच सुरूंग लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
Municipal Elections Politics; Sunil Tatkare And Eknath Shinde
Municipal Elections Politics; Sunil Tatkare And Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती पुंडलिक पाटील आणि त्यांचे सुपुत्र पंकज पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

  2. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे कर्जतमध्ये राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  3. या भेटीने शिंदे सेनेतील अंतर्गत नाराजी आणि राष्ट्रवादीबरोबर नव्या समीकरणांच्या चर्चेला वेग आला आहे.

Raigad News : रायगड जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू असणाऱ्या वादामुळे महायुतीला सुरूंग लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्रीपदाचा वाद आता स्थानिकपर्यंत आला असून पक्ष वाढीच्या राजकारणामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांचे नेते पदाधिकारी पळवताना दिसत आहेत. यामुळे महायुतीतील वाद आणखी चिघळला आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या गळाला रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती पुंडलिक पाटील आणि त्यांचे सुपूत्र शिंदे सेनेचे कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख पंकज पाटील लागल्याचे दिसत आहे. या बाप-लेकांनी नुकताच नगरपरिषदेची रणधुमाळी सुरु असतानाच तटकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याने आता राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा सुरु झाली आहे.

कर्जत येथे सोमवारी (ता.10) सायंकाळी पाटील पिता-पुत्रांनी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे यांच्यासमवेत मुंबईतील प्रदेश कार्यालयात जावून तटकरेंची भेट घेतली. यावेळी श्रीखंडे पांचीही उपस्थित होते. यावेळी सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याचेही आता समोर येत असून त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार होता. पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो लांबणीवर पडला होता.

दरम्यान त्यांनी मंगळवारी (ता.11) पक्षातील आपल्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून तो जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्याकडे पाठवविला होता. त्यानंतर त्यांनी मुंबईत जावून थेट तटकरेंची भेट घेतल्याने आता शिवसेनेला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Municipal Elections Politics; Sunil Tatkare And Eknath Shinde
Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महापालिकेत 'या' दिग्गजाचा वारसदार ठोकणार शड्डू; मतदार कुणाला देणार कौल?

विशेष म्हणजे ते ज्या जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंबरोबर पक्ष कार्यालयात गेले होते. त्यांच्यात आणि घारे कुटुंबामध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले होते. पण आता पाटील आणि घारे कुटुंबामध्ये मनोमिलन झाले असून त्यांनी मुलासह तटकरेंची भेट घेतल्याने आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कोण आहेत पुंडलिक पाटील?

पुंडलिक पाटील (1992) हे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य राहिले असून ते कर्जत जिल्हा परिषद गटातून विजयी झाले होते. त्यावेळी ते अर्थ, बांधकाम व शिक्षण सभापती ही झाले. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुनील तटकरे होते. त्यानंतर त्यांनी 1994 साली कर्जत नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीला निर्विवाद सत्ता मिळवून दिली होती. तर त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला होता.

परंतु त्यांना अंतर्गत राजकारणामुळे पक्षाने उमेदवारी दिली नाही. ज्यानंतर त्यांनी शिंदे शिवसेनेचे काम करण्यास सुरुवात केली. पक्षसंघटना वाढविण्यासाठी त्यांनी चांगले नियोजन केले होते. त्यांच्याकडे कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख ही महत्वाची जबाबदारी होती. अगदी काल परवापर्यंत ते कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे काम करत होते.

Municipal Elections Politics; Sunil Tatkare And Eknath Shinde
Thane Municipal Election : ठाणे महापालिकेत मोठी उलथापालथ! आरक्षण सोडतीने अनेक दिग्गजांचा 'हिरमोड'; कोणाचे नशीब फळफळले?

FAQs :

1. पुंडलिक आणि पंकज पाटील यांनी कोणाला भेट दिली?
दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

2. ही भेट कधी झाली?
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत ही भेट झाली आहे.

3. या भेटीचे राजकीय महत्त्व काय आहे?
या भेटीमुळे कर्जत तालुक्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

4. पंकज पाटील कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत?
पंकज पाटील हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख आहेत.

5. या भेटीवर स्थानिक पातळीवर काय चर्चा आहे?
या भेटीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात’ म्हणून पाहिले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com