Deepak Kesarkar, bjp
Deepak Kesarkar, bjp  Sarkarnama
कोकण

Kokan News: भाजपचा डाव केसरकरांनी उधळून लावला; 'या' ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा रोवला

सरकारनामा ब्यूरो

Deepak Kesarkar News : राज्यातील जवळपास सात हजारांवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका गेल्या महिन्यांत पार पडल्या. यात भाजप नंबर एकचा पक्ष ठरला. त्यात शिंदे गटानं देखील पहिल्याच दणक्यात चांगलं यश मिळालं.

पण कोकणातील असनिये ग्रामपंचाययीवरुन भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली होती. कारण या ग्रामपंचायतीवर भाजपनं दावा ठोकला होता. पण शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकरांनी भाजपला शह देत असनिये ग्रामपंचायत सदस्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घडवून आणला.

सावंतवाडीतील असनिये गावच्या सरपंच रेश्मा सावंत, उपसरपंच साक्षी सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’मध्ये प्रवेश केला. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर भाजपने केलेला दावा फोल ठरला आहे. तालुकाप्रमुख बबन राणे यांच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश झाला.

तालुक्यातील असनिये ग्रामपंचायतीवर विकास पॅनेलची सत्ता आली होती. या ठिकाणी सरपंचपदी रेश्मा सावंत निवडून आल्या होत्या. या ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला होता. आज ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’त प्रवेश केला.

यावेळी उपसरपंच साक्षी सावंत, सदस्य निधी नाईक, दर्शना दामले, भरत सावंत यांनी प्रवेश केला. यावेळी राकेश सावंत, संदीप सावंत, जितेंद्र सावंत, रमेश सावंत, सतीश सावंत, आनंद ठिकार, प्रीतेश ठिकार, लक्ष्मण सावंत, प्रेमानंद ठिकार, भिकाजी नाईक, सुभाष सावंत, दशरथ सावंत, देवेंद्र सावंत, ओंकार सावंत, आप्पा कोलते, सूरज कोलते, नीलेश पोकळे, रुपेश सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, शाखाप्रमुख, माजी विभागप्रमुख यांनी मंत्री केसरकरांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’ प्रवेश केला.

यामध्ये आरोंदा उपसरपंच व माजी शाखा प्रमुख अशोक नाईक, माजी विभाग प्रमुख प्रशांत कोरगावकर, पंच सदस्य अशोक खोबरेकर, वसंत मेस्त्री, वासुदेव गडेकर, वामन मठकर, तळवणे माजी सरपंच मिलिंद कांबळी, माजी शिवसेना बूथप्रमुख सतीश रेडकर, तिरोडा माजी सरपंच अनिल केरकर, उपशाखाप्रमुख नीलेश सावंत, कृष्णा केरकर, पुरुषोत्तम केरकर यांचा समावेश आहे. मंत्री केसरकर यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गावातील विकासकामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT