Shubhangi Patil : शुभांगी पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या, '' तीन महिन्यांपूर्वी भाजप नेत्यांनी शब्द दिला,पण....''

Nashik Padvidhar Election : काहीतरी कारण असल्याशिवाय कुणी नॉट रिचेबल होणार नाही...
shubhangi patil, bjp, chandrashekhar bawankule, girish mahajan
shubhangi patil, bjp, chandrashekhar bawankule, girish mahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Padvidhar Election: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं चित्र अखेर स्पष्ट झालं आहे.आता या विधानपरिषदेची लढत ही तिरंगी होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता एकूण १६ उमेदवार रिंगणात आहे. याचदरम्यान अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. यात शुभांगी पाटील (Shubhangi Patil) अचानक नॉट रिचेबल झाल्या होत्या. त्यांच्या अचानक नॉट रिचेबल होण्यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. मात्र, अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर पाटील समोर आल्या. त्यांनी भूमिका स्पष्ट केली. याचदरम्यान त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

पाटील म्हणाले, राजकारणात सहन करणं हे, ते सगळं चालत असतं, शेवटी राजकारणात काय वेळ येईल हे सांगता येत नाही. काहीतरी कारण असल्याशिवाय कुणी नॉट रिचेबल होणार नाही, नॉटरिचेबल का झाले हे वेळेवर सांगेल असं सूचक वक्तव्य देखील पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

shubhangi patil, bjp, chandrashekhar bawankule, girish mahajan
Pimpri-Chinchwad News : 'अजितदादांसह अनेकांनी माझा 'कार्यक्रम' केला, राष्ट्रवादीच्याच नेत्याची खंत

याचवेळी त्यांनी भाजपाला काम करणारं व्यक्तीला थोडासा वेगळा विचार केला असेल, म्हणून त्यांनी ती संधी दिली नाही असं मत व्यक्त केलं आहे. भाजपमध्ये अवघ्या तीन महिन्यापूर्वी गेली होती. तीन महिन्यांसाठी कोणी गेले असतं का? शब्द दिला म्हणूनच, भाजपात प्रवेश केला होता. तुम्ही पक्षात या आम्ही विचार करू असं गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं.

मात्र, ऐनवेळी त्यांना मोठा माणूस मिळाल्यावर सर्वसामान्य माणसाला कोण विचारतो. म्हणून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. पण ठाकरे गटाचा, महाविकास आघाडीचा मला पाठिंबा आहे. आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा, असा विश्वासही शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला असा आत्मविश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

shubhangi patil, bjp, chandrashekhar bawankule, girish mahajan
Satish Itkelwar म्हणाले, पक्षाचे मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण...

तसेच नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आपल्याला पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजितदादा, जयंत पाटील या सगळ्यांशी संवाद साधला आहे. त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते महाराष्ट्रातल्या एकमेव महिला उमेदवारांवर, एकमेव काम करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास टाकलेला आहे. या सर्वांशी संपर्क झाला असून महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल यात शंका नाही.

आता तिकीट न मिळाल्यानं त्यांचं मन बदललं असेल...

सुमारे वीस दिवसांपूर्वी त्यांनी आमच्याकडं प्रवेश केला. याला तीन आठवडे झाले असतील. त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं की, तिकीटाची खात्री देणार नाही.तिकीट मिळेल नाही मिळेल, हे आम्ही काही सांगू शकत नाही.तिकीट मिळालं नाही, तर काय, असं त्यांना विचारलं होतं. तेव्हा शुभांगी पाटील यांनी पक्षाचं प्रामाणिक काम करण्याचं आश्वासन दिलं होतं.

पण, आता तिकीट न मिळाल्यानं त्यांचं मन बदललं असेल. त्यामुळं त्या उद्धव ठाकरे यांच्याकडं गेल्यात. शिवसेनेत प्रवेश करून घेतला. तिथं गळ्यात हार टाकून घेतला. त्यामुळं शुभांगी पाटील यांचा प्रश्न आमच्यासाठी संपला आहे असंही महाजन यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com