Sunil Tatkare, Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Sunil Tatkare:'त्या' दोन वर्षांमध्ये अजितदादांनी सरकार चालवलं! तटकरेंनी ठाकरेंना सुनावलं

kokan Politics:ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा एकही मुद्दा नाही

सरकारनामा ब्यूरो

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांच्या रायगड दौऱ्यात खासदार सुनील तटकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष केलं होतं या सगळ्याचा समाचार आता सुनील तटकरे यांनी घेतला आहे. कोरोना कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणीकडे होते, असा सवाल विचारणाऱ्या ठाकरेंनाच आता तटकरेंनी 'महाविकास आघाडीच्या त्या दोन वर्षात सगळं सरकार हे अजितदादांनी चालवलं, अशा शब्दात तटकरे यांनी ठाकरेंना सुनावले.

कोरोना काळात पंतप्रधान आले का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता, मात्र देशात वेगवेगळ्या भागात निसर्गाचे अनेक तडाखे बसत असतात सगळ्याच ठिकाणी पंतप्रधान पोहोचू शकत नाहीत मात्र आता मलाही ठाकरे यांना प्रश्न विचारावा लागेल तुम्ही मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या त्या दोन वर्षांमध्ये अजितदादांनी सरकार चालवलं त्यामुळे या सगळ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणांमधून मनोरंजन होत असल्याची टीका तटकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा एकही मुद्दा नाही रायगड मधील मेडिकल कॉलेजचे प्रयत्न कोणी केले या सुनील तटकरे यांनी प्रयत्न केले या जिल्ह्यासाठी अनंत गीते यांचं काय योगदान आहे ? असा सवालही तटकरे यांनी उपस्थित केला. सहा वेळा लोकसभेवर जाऊन दहा वर्ष केंद्रात मंत्री राहून एखादी योजना अनंत गीतेने सांगावी आणि लाख रुपयाचं बक्षीस मिळवावे, असे थेट आव्हान तटकरे यांनी गीते यांना दिल आहे. तुम्ही टीका करा पण टीका करताना तुमच्याकडे विकासाचे मुद्दे काय आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर घराणेशाहीचा आरोप करावा हे हास्यास्पद आहे. उद्धवजींच्या भाषणामध्ये दोन-तीन दिवस अनेक गमतीजमती ऐकायला मिळाल्याची ही खिल्ली तटकरे यांनी उडवली आहे.

2019 च्या मोदी लाटेमध्ये सुद्धा खासदार सुनील तटकरे हे निवडून आले हे उद्धव ठाकरे यांनी कबूल करत मी गेले अनेक वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे, त्याची नोंद रायगडच्या जनतेने घेतली याची स्पष्टपणाची कबुली उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातूनच दिली आहे, असेही सुनील तटकरे यांनी ठाकरे यांना सुनावले. दहा वर्षात मोदी सरकारने काय काम केलं, असा सवाल उद्धव ठाकरे विचारत आहेत. त्यांच्या बाजूलाच असलेले घोषित उमेदवार अनंत गीते हे पाच वर्ष मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते त्यामुळे हा प्रश्न जर का हा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी गीतेंनाच विचारला असता तर अनंत गीते यांना 2019 साली रायगड-रत्नागिरीच्या जनतेने का नाकारलं याचे उत्तर उद्धव ठाकरे यांना सापडलं असतं, असाही टोला तटकरे यांनी लगावला आहे.

दोन्ही मुलं ही गुणवत्तेवर राजकारणात ..

माझी दोन्ही मुलं ही गुणवत्तेवर राजकारणात आहेत, आदिती तटकरे हिला श्रीवर्धनच्या जनतेने 40 हजार मताधिक्याने निवडून दिलं तर अनिकेत तटकरे याला 650 मते मिळाली आणि तो विधान परिषदेवर गेला. त्यामुळे अशा प्रकारचा घराणेशाहीचा आरोप हा उद्धव ठाकरे यांच्याकडून होणं हे फारच हा हास्यास्पद असल्याचं तटकरे यांनी म्हटल आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचे पुत्र सहभागी झाले शिवसेनेमध्ये फूट पडल्याचं ते एक मोठं कारण आहे, असं म्हटलं जातं पण मला माहिती नाही अशावेळी माझ्यावर आरोप करण्याचा फार नैतिक अधिकार कोणाला आहे, असं मला वाटत नाही, असेही तटकरे यांनी ठाकरेंना सुनावले.

पुन्हा निवडणूक लढवणार

आपण स्वतः लोकसभा लढायला पुन्हा इच्छुक असून महायुतीच्या जागांचं वाटप आठ पंधरा दिवसात निश्चित होईल महायुती मधून ही जागा दर्गा राष्ट्रवादीला मिळाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादांनी जर का मला उमेदवारी दिली तर मी या ठिकाणी पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचेही तटकरे यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT