Konkan Political News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे व आमदार भरत गोगावले यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले होते. आजपासून (4 व 5 फेब्रुवारी) दोन दिवस रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर ठाकरे येत आहेत. विशेष म्हणजे आज (4 फेब्रुवारी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे नारायण राणे यांच्या घराजवळच ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेबद्दल उत्सुकता वाढली असून, या सभेला कमालीचे महत्त्व आले आहे. (Uddhav Thackeray Rally In Kokan Tour)
मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येत आहेत. येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा कोकणासाठी महत्वाचा मानलं जातं आहे.त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना बळ देणारा हा दौरा असणार आहे.
भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थाच्या समोर उद्धव ठाकरे यांची सभा उद्या होणार आहे.त्यामुळे नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात होत असलेली उद्धव ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे कणकवलीतील या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह पसरला आहे. उद्धव ठाकरे यांची कणकवलीतील सभा कार्यकर्त्यांच्या आग्रहातखातर घेतली असल्याचे, म्हटले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांची कॉर्नर सभा होणार आहे.या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनतेच्या आग्रहाखातर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात उद्या रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता जनसंवाद सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असून त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करणारा आहे.या जाहीर सभेमुळे शिवसैनिकामध्ये प्रचंड उत्साह पसरला आहे.
आज रविवारी 4 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता गांधी चौक सावंतवाडी येथे कॉर्नर सभा, कुडाळ जिजामाता चौक येथे कॉर्नर सभा घेऊन जनतेशी उद्धव ठाकरे संवाद साधतील. दुपारी 3 वाजता मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील सिंहासन आणि मंदिर नूतनीकरण चे शिवप्रेमींना लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर 5 वाजता आंगणेवाडी भराडीदेवीचे दर्शन घेऊन सायंकाळी 6 वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभेत संबोधित करणार आहेत.
उद्या 5 फेब्रुवारी रोजी राजापूर धूतपापेश्वर मंदिरात दर्शन घेऊन रत्नागिरी आठवडा बाजार ठिकाणी जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी चिपळूण येथे जनतेशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.