Kokan News : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्गाचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या लेखाजोखा कार्यअहवाल प्रकाशन कार्यक्रमात आमदार वैभव नाईक यांनी भाजपवर टीका करत महायुती मधील शिवसेनेच्या शिंदे गटाकडून इच्छुक असलेले उमेदवार किरण सामंत यांचा समाचार घेतला आहे. ही लढाई शिवसेना किंवा विनायक राऊत यांची नाही तर मोदी यांच्या विरोधात आहे. आमच्यातून फुटलेल्या गद्दार लोकांविरुद्ध आहे. भाजपाला सर्व पक्ष फोडून आपलाच पक्ष ठेवायचा आहे, असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. (Latest Marathi News)
यावेळी खासदार विनायक राऊत, ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाळा गावडे, सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,जान्हवी सावंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत, अतुल रावराणे, संग्राम प्रभुगावकर,भाई गोवेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, रेवती राणे, अर्चना घारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, नागेश मोरये, सायली पाटकर, नितिषा नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाईक पुढे म्हणाले की, जरी जिल्ह्यात आमचा शिवसेना पक्ष मोठा भाऊ असला तरी आज आमच्या पक्षापेक्षा आघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठी आहे. म्हणजेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. उद्या भाजपाच्या तिकीटावर किरण सामंत लढतील, हे विश्वासाने सांगतो. त्यामुळे आमच्यावर फरक पडणार नाही, विश्वास शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
आता आमच्याकडे पैसे नाहीत,ज्यांच्याकडे होते,ते सोडून गेले आहेत.मराठा समाज नेते मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलण्यासाठी सभागृहात फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनेकांना उठवले.त्यांची चौकशी लावली.जिल्ह्यात जुने भाजपा नेते कुठे आहेत? कालच्या कणकवली येथील नमो रोजगारमध्ये आम्ही गेलो तर दुपारी चारच लोक होते.प्रत्येक गोष्टीत भाजपाने जनतेसमोर जुमला केला आहे.तुमची लढाई आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांसोबत आहे,तुम्ही मोदी किंवा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना आणा काहीही परिणाम होणार नाही.या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कोकण विभाग उपाध्यक्ष अर्चना परब घारे म्हणाल्या,खासदार विनायक राऊत यांनी खऱ्या अर्थाने गेल्या १० वर्षात मतदार संघाचा विकास केला .त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष पुर्ण ताकदीनिशी राऊत यांच्या विजयासाठी काम करेल असे त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांना हमी भाव नाही,शेतकऱ्यांना जगणं कठीण करून ठेवलं,असे हे केंद्र आणि राज्य सरकार आहे.त्यामूळे आम्ही निष्ठेने काम करु आणि विनायक राऊत यांना विजयी करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.