Pune Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साेमवारी आमचे फाटे वेगळे झाले आहेत, असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर सुप्रिया सुळेंनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही आणि पवार फॅमिलीमध्येही फूट नाही, असे विधान केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट एकमेकांसमोर ठाकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार यांना बहाल केल्यानंतर या दोन्ही गटांतले वाद टोकाला गेल्याचं चित्र दिसत आहे. अशातच सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसल्याचे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. NCP Politics
शिरूर दौऱ्यावर असताना अजित पवारांनी (Ajit Pawar) आमचे फाटे वेगळे झाल्याचे स्पष्ट केले. यावर पुण्यात असलेल्या सुळेंनी आम्ही एकच असल्याचे ठासून सांगितले. सुळे म्हणाल्या, माझा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे. सर्व पक्षांतील लोकांशी माझे संबंध सलोख्याचे आहेत. आमच्यातील मतभेद हे राजकीय आणि वैचारिक असून, कुणाशीही मनभेद नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही. तसेच पवार फॅमिलीमध्ये फूट नाही. आमच्या कुटुंबात प्रत्येकाला प्रायव्हसीचा अधिकार आहे, असे सुळेंनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सुळे म्हणाल्या, आमच्या कुटुंबात मला, शरद पवार, रोहित पवारांना (Rohit Pawar) प्रायव्हसीचा अधिकार नाही. मात्र, बाकीचे जे उर्वरित कुटुंबीय आहेत, त्यांना तो आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबात ज्या काही चर्चा होतात त्या उघडपणे सांगता येणार नाहीत. आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलता, हे थोडीच मला सांगणार आहात, असा चिमटाही सुळेंनी काढला.
अजित पवारांच्या विधानावर सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, कुणी कसे वागायचे हा ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. मात्र, ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये चर्चा झालीच पाहिजे. आपण आपले प्रोफेशनल आयुष्य आणि प्रायव्हेट आयुष्य एकत्रित करू शकत नाही. त्यासाठीची वैचारिक प्रगल्भता आमच्यात आली पाहिजे, असे मतही सुळेंनी या वेळी व्यक्त केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यापासून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तो संभ्रम दूर करण्याचा अजितदादांनी वारंवार प्रयत्न केला. मात्र, खासदार सुप्रिया सुळे आमच्यात फूट पडली नसल्याचे वारंवार ठासून सांगताना दिसत आहेत. परिणामी राष्ट्रवादीत नेमकं काय सुरूय, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.