Ratnagiri Sindhudurg LokSabha Election 2024 Sarkarnama
कोकण

Kokan Politics: कोकणात नवा ट्विस्ट; किरण सामंतांची माघार; महायुतीकडून नारायण राणेंचे नाव फायनल?

Ratnagiri Sindhudurg Loksabha Election 2024: मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता आणि अब की 400 पार होण्याकरिता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेत आहे," असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

Mangesh Mahale

Kokan Latest Political News : कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. समाज माध्यमांवर त्यांनी पोस्ट शेअर करीत याबाबत माहिती दिली आहे.

ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election 2024) मतदारसंघातून इच्छुक होते. या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे राज्यसभेतून निवृत्त झाले असून, त्यांना भाजपने पुन्हा संधी दिलेली नाही, त्यामुळे राणे या मतदारसंघातून लोकसभा लढतील, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election 2024 Withdrawal of Kiran Samant post went viral on social media)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नारायण राणे यांनी सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच असल्याचे सांगून आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आम्ही नारायण राणेंच्या नेतृत्वात महायुतीत काम करू, असे सामंतांचे विधान समोर आले.

" पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता आणि अब की 400 पार होण्याकरिता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेत आहे," असे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी ही पोस्ट आता डिलीट केल्याचे दिसते. मात्र, त्यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात कोकणात खळबळ उडाली आहे.

महायुतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आल्याचेही स्पष्ट झाल्यानंतर नारायण राणे हेच उमेदवार असल्याचेही जवळपास निश्चित मानले जात आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेच्या समर्थकांना किरण सामंत यांच्या प्रचारास सुरुवातही केली होती.

आता सामंतांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. खुद्द नारायण राणेंनी आपली उमेदवारी जाहीर केल्याने आता येथे महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत विरुद्ध् महायुतीकडून नारायण राणे यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून किरण सामंतांनी जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. ही उमेदवारी शिवसेनेला मिळेल, असा दावा कोकणातील शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. यावरून विविध कार्यक्रमांत भाजप आणि शिवसेना नेत्यांनी दावे-प्रतिदावे केले होते.

राणेंनी हा मतदारसंघ भाजपचाच असल्याचा दावा करीत आपण इच्छुक असल्याचे जाहीर करताच या मतदारसंघातील राजकीय चित्र बदलले आहे. सामंत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गात किरण सामंत यांना मानणारा मोठा जनसमुदाय आहे. येथून भाजपचा उमेदवार लढणार असेल तर त्याला शिवसेनेचे नेते किती पाठिंबा देतील, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT