कोकणातील राजकारणात पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी महेंद्र थोरवे यांच्या कर्जत मतदारसंघावर दावा करत 2029 ची विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
यापूर्वी विकास गोगावले यांच्या दाव्यानंतर महायुतीतील तणाव वाढला होता आणि आता नव्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
Kokan NCP Vs Shivsena Political Row News : कोकणातील राजकारणास पुन्हा एकदा उकळी फुटली असून नव्या दाव्यांमुळे महायुतीत मीठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. काहीच दिवसांच्या आधी रष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या जागेवर शिवसेनेनं दावा केला होता. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी तसा दावा कल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर तटकरेंनी आपल्यामुळे शिवसेना सत्तेत असल्याचा टोला लगावला होता. ज्याची राज्यभर खमंग चर्चा झाली होती. हा विषय अद्याप बाजूला झाला नाही तोच राष्ट्रवादीच्या नेत्याने आमदार महेंद्र थोरवे यांच्या कर्जत मतदारसंघावर दावा करत '२०२९ ची विधानसभा मीच लढवणार' असे म्हणत दंड थोपाटले आहेत. यामुळे पुन्हा एकदा कोकणात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असा वाद सुरू झाला आहे.
खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणाने कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आमदार थोरवे यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नाव घेत तटकरे यांच्यावर हल्ला चढवला होता. तर या हत्त्येचा कट तटकरेंच्या बंगल्यावर शिजल्याचा दावा केला होता. तसेच घारेंचा या हत्याकांडात हात असल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर या हत्येसाठी १ कोटी रुपयांची सुपारी दिली गेल्याचा गंभीर आरोप केला होता.
ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत मुख्य सुत्रधारासह १४ पेक्षा जास्त संशयितांना अटक केली होती. पण घारे यांच्याबाबत कोणताच निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर ते 'नॉट रिचेबल' झाले होते. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात ते दिसले होते. यानंतर आता 'नॉट रिचेबल'च्या चर्चाना पूर्णविराम देत घारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी, सुनील तटकरे हेच आमचे नेते असून, मी २०२९ ची विधानसभा निवडणूक लढविणार आहे, असे जाहीर केले आहे.
...कोणताही निर्णय घेणार नाही
त्यांनी 'नॉट रिचेबल'च्या चर्चावर बोलताना, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमानंतर नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांतीसाठी आपला मोबाईल बंद ठेवला होता. त्याच काळात 'नाराज' किंवा 'नॉट रिचेबल' असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्याचे सांगितले. तसेच या अफवांनी निवडणुका नसतानाही माझा चांगला प्रचार केला आणि आपल्याला चर्चेत ठेवल्याचेही ते म्हणाले.
...नाराज नाहीत
घारे यांनी स्पष्ट केले की, ते पक्षावर किंवा नेत्यांवर अजिबात नाराज नाहीत. कार्यकर्त्यांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही नमूद केले. आतापासूनच त्यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे सांगितले. पक्षाने मला जिल्हाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. तटकरे साहेब माझ्या पाठीशी वडिलांसारखे उभे आहेत आणि ते योग्य वेळी मला नक्कीच संधी देतील, असा विश्वास घारे यांनी व्यक्त केला.
अधिक चांगला विकास होईल...
आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासकामे करताना महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना योग्य न्याय दिल्यास कर्जतचा अधिक चांगला विकास होईल, असे सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तर खोपोलीतील मंगेश काळोखे हत्येप्रकरणी स्वतःचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाला, परंतु पोलिस तपासात आपला कोणताही संबंध नसल्याचे सिद्ध झाले आहे, असा खुलासा त्यांनी केला.
घारे यांनी कर्जत खालापूरमधून २०२४ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना चांगली मते मिळाली होती. तर त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. पण आता २०२९ची निवडणुक लढवणारच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर काही दिवसांपूर्वीत आमदार थोरवे यांनी त्यांच्यातील आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्यातील मतभेद संपुष्टात आले असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद संपुष्टात आल्याचेही चर्चा होती. मात्र आता घारे यांच्या आगामी निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे दोन्ही पक्षातील वादाला नव्याने फोडणी पडल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत मतदारसंघावर दावा करत 2029 ची विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
सुधाकर घारे, महेंद्र थोरवे, भरत गोगावले आणि विकास गोगावले यांची नावे चर्चेत आहेत.
मतदारसंघांवरील दावे आणि परस्पर वक्तव्यांमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव वाढला आहे.
विकास गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या जागेवर दावा केल्याने आधीच राजकीय वाद निर्माण झाला होता.
कोकणातील महायुतीच्या राजकीय समीकरणांवर आणि आगामी विधानसभा निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.