Kokan Politics : एकनाथ शिंदेंनी कोकणातील ठाकरेंचा बडा नेता गळाला लावला; पक्षांतराच्या चर्चांना उधाण, 'ऑपरेशन टायगर'ची हवा

Sandesh Parkar Join Shinde Shivsena : उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यानंतर राज्यभर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदे शिवसेनेच्या संपर्कात.

  2. ठाकरेंच्या शिवसेनेतील पद सोडल्यानंतर पक्षांतराच्या चर्चांना उधाण.

  3. शहर विकास आणि कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार.

Kankavli Nagarpanchayat Politics : राज्यातील पोट निवडणुकांसह विधान परिषदांच्या जागांचा निकाल लागताच मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकीकडे खासदार संजय जाधव यांनी, आज मी ठाकरेंबरोबर आहे, पण पुढे काय होईल सांगता येत नाही." असे म्हणत राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यापाठोपाठ आता आणखी एका खासदाराने एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केल्याने नव्या चर्चा सुरू झाल्या. अशातच ठाकरेंचा नगराध्यक्ष देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समोर येत असून ऑपरेशन टायगरची हवा पुन्हा वाहू लागल्याचे बोलले जात आहे.

राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सुरू झाल्याचे सुतोवाच काहीच दिवसांच्या आधी मंत्री संजय शिरसाट यांनी केले होते. त्यापाठोपाठ खासदार संजय जाधव यांनी पक्ष सोडण्याची अधिकृत घोषणा न करता आपण पुढे शिवसेनेबरोबर असेनच असे नाही असे म्हणत खळबळ उडवून दिली.

अशातच ठाकरेंचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी देखील शिंदे यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे ठाकरेंच्या शिवेनेला पुन्हा मोठे हादरे बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Uddhav Thackeray
Kokan Politics : भाजप आमदाराकडून महिलांची फसवणूक? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने ‘जुमलेबाज‌’ म्हणत केले गंभीर आरोप

दरम्यान कोकणात देखील ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कणकवली नगरपालिकेचे नगराध्यक्ष संदेश पारकर हे शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असून ते लवकरच शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

एकीकडे नगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी ठाकरेंनी साफ न कार देत शिंदेंच्या शिवसेनेशी युतू नको असे फर्माण बजावले होते. तरीही संदेश पारकर यांनी कणकवली पॅटर्न राबवला. येथे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी नगराध्यक्ष पद आपल्याकडे खेचून आणले.

यावेळी कणकवली पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली तर पारकर ठाकरेंचे शिवसेनेचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देखील दिला होता. यानंतर पारकर शिवसेनेसोबत जातील अशा चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. तर आता शहराच्या विकासासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावाच लागणार, असल्याचेही पारकर यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray
kokan politics : राजकीय रणधुमाळीत भावनिक ट्विस्ट! जाधवांनी सामंतांना दिला अनपेक्षित सल्ला; ‘हेलिकॉप्टरने फिरतोस…’

FAQs :

1. संदेश पारकर कोण आहेत
कणकवली नगरपालिकेचे नगराध्यक्ष

2. ते कोणत्या पक्षात जाण्याची शक्यता आहे
शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता

3. त्यांनी कोणता पदाचा राजीनामा दिला आहे
ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुख पद

4. कणकवली पॅटर्न काय आहे
शहर विकास आघाडीच्या पाठिंब्याने सत्ता मिळवण्याचा राजकीय प्रयोग

5. अंतिम निर्णय कधी होणार
कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com